भारतीय क्रिकेट जगातातील एक चेहरा सर्वांच्या ओळखीचा आहे. त्या माजी भारतीय क्रिकेटपटूच्या जीवनावर २०१६मध्ये अजहर हा हिंदी चित्रपट बनवण्यात आला होता. हा क्रिकेटपटू म्हणजे मोहम्मद अझरुद्दीन. आपल्या कारकिर्दीत दमदार खेळी करणाऱ्या अझरुद्दीनची कसोटी करकिर्द मात्र ९९ सामन्यांवर अडकली. त्यांना त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील सामन्यांचे शतक (१००) पूर्ण करण्याचे भाग्य लाभले नाही.
८ फेब्रुवारी १९६३ला हैद्राबाद येथे जन्मलेल्या अझरुद्दीनने १६ वर्षात भारताकडून ९९ कसोटी सामने आणि ३३४ वनडे सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने कसोटीत ६२१५ धावा, तर वनडेत ९३७८ धावा केल्या होत्या. एवढेच नाही तर, अझरुद्दीन हे ४७ कसोटी आणि १७४ वनडे सामन्यात भारताचे कर्णधार होते. परंतु, या यशस्वी खेळाडूच्या कारकिर्दीच्या शेवटी कलंक लागला आणि बीसीसीआयने त्यांच्यावर आजीवन क्रिकेट खेळण्यास प्रतिबंध घातले होते. मात्र, अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर अझरुद्दीनवरील प्रतिंबध हटवण्यात आला.
कदाचित या कारणांमुळेच दिग्दर्शक टोनी डिसूजाला अझरुद्दीनची कहाणी रोमांचक वाटली आणि त्यांनी त्याच्या जिवनावर चित्रपट काढला. या चित्रपटात इमरान हश्मीने अझरुद्दीनची भूमिका निभावली आहे. Mohammed Azharuddin’s Life Based Movie Of Tony Dsouza Named Azhar
चित्रपट सुरु होताच पहिला सीन हा अझरुद्दीनच्या ९९व्या कसोटी सामन्यातील शतकाचा आहे. परंतु, या सामन्यानंतर मॅच फिक्सिंगच्या आरोपात अजहरवर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली. अजहरने या सामन्यासाठी कोर्टात अपिल केली आणि मग चित्रपटाची कहाणी १९६३मध्ये अजहरच्या जन्माच्या वर्षात जाते.
जेव्हा अजहरचा जन्म होतो, तेव्हा त्याचे आजोबा स्वप्न बघतात की त्यांचा नातू मोठा होऊन भारताकडून १०० कसोटी सामने खेळणार. नंतर कहाणी अजहरच्या आयुष्यातील घटना दर्शित करते आणि शेवटी मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे अजहरच्या आजोबांचे स्वप्न अधुरे राहून जाते.
ट्रेंडिंग घडामोडी-
…म्हणूनच चाहते महत्त्वाचे आहेत – रोहित शर्मा
मैदानावर पाय ठेवण्यापुर्वी या ४ गोष्टी हिटमॅन करतो म्हणजे करतोच
प्रेक्षकांविना सामने खेळवण्याबद्दल बीसीसीआयचे मोठे भाष्य