अहमदाबाद। इंडियन प्रीमियर लीगला अनेक वर्षांनी नवा चॅम्पियन मिळाला आहे. गुजरात टायटन्सच्या संघाने 15व्या हंगामाच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सला 7 विकेट्सने पराभूत केले. गुजरातच्या संघाने शेवटची विजयाची धाव घेतली, तशी बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविक धावत मैदानावर आली आणि तिनं पती हार्दिक पंड्याला मिठी मारली. 2016मध्ये सनरायजर्स हैदराबादने खिताब जिंकला होता. यानंतर 2021 पर्यंत केवळ मुंबई इंडियन्स (2017, 2019, 2020) आणि चेन्नई सुपर किंग्सच्या (2018, 2021) टीम्सनेच आयपीएल कपवर आपले नाव कोरले होते. पाच वर्षांनी आता एक नवा संघ विजेता बनला आहे. गुजरात टायटन्सच्या विजयानंतर अनेकजण संघाला सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत.
इएसपीएन क्रिकइंफोने स्वदेशी सोशल मीडिया मंच ‘कू’वर फोटो शेयर करत लिहिले, “विजयाचा क्षण!” तसेच, मोहम्मद शमीने सोशल मीडिया मंच ‘कू’वर संघाचा ग्रुप फोटो के शेयर करत “आयपीएल 2022 चॅम्पियन्स,” असे लिहिले आहे.
प्रज्ञान ओझाने देशाचा पहिले बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग मंच ‘कू’वर फोटो शेयर करत लिहिले, “आईपीएल 2022 फायनल.”
गुजरातला मागच्याच वर्षी सीवीसी कॅपिटलने विकत घेतले होते. यानंतर संघाने अनेक मोठमोठे खेळाडूही विकत घेतले. मात्र, कुणालाच आशा नव्हती की, हा संघ चॅम्पियन बनेल. कागदावर पाहताना हा संघ ताकदवान दिसत नव्हता. मात्र, हार्दिकच्या नेतृत्वात गुजरातच्या टीमने स्वत:ला सिद्ध करत कपवर आपले नाव कोरले.
हा विजय गुजरातसोबतच हार्दिकसाठीही मोलाचा ठरला. त्याने या हंगामात फलंदाजीसह गोलंदाजीतही आपली कमाल दाखवली. हार्दिकने या सीझनच्या 15 सामन्यांमध्ये 44.27ची सरासरी आणि 131.26च्या स्ट्राईक रेटने 487 धावा काढल्या. यात चार अर्धशतकही आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल जिंकणारा हार्दिक चौथाच भारतीय कर्णधार; पाहा आयपीएल विजेत्या संघनायकांची संपूर्ण यादी
‘कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रँट’चं उदाहरण आहे हार्दिक पंड्या; गंभीर, रोहितनंतर केलीय ‘ही’ कमाल
राजस्थानच्या जुन्या खेळाडूनेच केला ‘रॉयल्स’चा घात, अंतिम सामन्यात चोप चोप चोपले