नेपीयर। भारतीय संघाने बुधवारी (23 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडेत विजय मिळवत पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताच्या विजयात मोहम्मद शमीने 19 धावात महत्त्वाच्या 3 विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याला या सामन्यात सामनावीराचाही पुरस्कार देण्यात आला.
त्याचबरोबर तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने 56 सामन्यात हा पराक्रम केला आहे. या आधी हा विक्रम अष्टपैलू इरफान पठाणच्या नावावर होता. इरफानने 59 सामन्यात असा कारनामा केला होता.
शमीने हा विक्रम त्याची मुलगी आयरा हीला समर्पित केला आहे. याबद्दल त्याने ट्विट करत माहिती दिली आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘मला दिलेल्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. तसेच माझ्यावर एक खेळाडू आणि व्यक्ती म्हणून दाखवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद. मी माझा हा विक्रम माझ्या मुलीला समर्पित करत आहे.’
https://twitter.com/MdShami11/status/1088021628334686209
शमीने या सामन्यात न्यूझीलंडचे सलामीवीर फलंदाज कॉलीन मुन्रो आणि मार्टिन गप्टिल यांना स्वस्तात बाद केले होते. तसेच त्याने आक्रमक खेळू पाहणाऱ्या मिशेल सँटेनरलाही त्याने लवकर बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
–तेंडुलकर, गावस्कर, द्रविड यांनाही न जमलेली गोष्ट ४० वर्षीय वसीम जाफरने करून दाखवली
–केएल राहुल,हार्दिक पंड्याला मिळाली सर्वात मोठी खुशखबर, होऊ शकतो टीम इंडियात समावेश
–ऑस्ट्रेलिया दौरा गाजवलेला टीम इंडियाचा सदस्य आता खेळणार रणजी सामने