अनेक भारतीय क्रिकेटपटू कोविड-१९मुळे त्रस्त असणाऱ्या लोकांची मदत करत आहेत. सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे कामकाज ठप्प पडले आहे. याचे सर्वाधिक नुकसान मजदूरांना होत आहे. कामानिमित्ताने आपले गाव सोडून शहरात गेलेल्या मजदूरांवर उपासमारीची परिस्थिती ओढावली आहे. अनेकांना तर आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे मजदूर कसेबसे आपल्या गावी परतण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रवासी मजदूरांना मदत करण्यासाठी भारतीय संघाच्या एका क्रिकेटपटूने पाऊल उचलले आहे.
हा क्रिकेटपटू म्हणजे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी. कोविड-१९मध्ये लाॅकडाऊनमुळे त्रस्त असणाऱ्या लोकांची मदत करण्यासाठी त्याने उत्तर प्रदेशमधील राष्ट्रीय राजमार्ग २४च्या बाजूला मास्क आणि अन्न वाटप करण्यासाठी स्टॉल लावला आहे. एवढेच नाही तर, त्याने सहसपूर येथील आपल्या घराच्या बाहेरदेखील अन्न वाटपासाठी एक स्टॉल लावला आहे. यावरुन शमीची उदारता दिसून येते.
बीसीसीआयने काल (२ जून) एक क्लिप सोशल मीडियावर शेअर केली. त्यामध्ये शमी आपल्या घरासमोरच्या रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रवासी कामगारांना अन्नाने भरलेले पॅकेट वाटताना दिसत आहे. शमीच्या या समजासेवेला प्रोत्साहन देत बीसीसीआयने म्हटले की, आम्ही शमीच्या या कार्यामध्ये सोबत आहोत.
मी जितकी शक्य होईल तितकी सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. हे प्रवासी श्रमिक आहेत, ज्यांना वास्तवात खूप संघर्ष करावा लागत आहे. राजमार्ग माझ्या घराबासून जवळ आहे. त्यामुळे मी या लोकांना अडचणींचा सामना करताना पाहू शकतो. मला वाटते की मी या लोकांची मदत करायला पाहिजे आणि मी जितके शक्य आहे तितकी मदत करत आहे, असे पुढे बोलताना शमी म्हणाला.
As #IndiaFightsCorona, @MdShami11 comes forward to help people trying to reach home by distributing food packets & masks on National Highway No. 24 in Uttar Pradesh. He has also set up food distribution centres near his house in Sahaspur.
We are in this together🙌🏾 pic.twitter.com/gpti1pqtHH
— BCCI (@BCCI) June 2, 2020
शिवाय यापुर्वी शमीने एक घटना सांगितली होती. ज्यामध्ये त्याने आपल्या घराबाहेरील सीसीटिव्ही कॅमेरामध्ये एका प्रवासी मजदूराला भूखेने तडपडताना पाहिले होते. शमी म्हणाला होता की, मी त्या मजदूराला पाहताच त्याला काहीतरी खाऊ घालण्यासाठी घराबाहेर गेलो होतो. तो राजस्थान ते लखनऊ आणि तेथून बिहार अशा प्रवासाला निघाला होता.