सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात अखेर भारतीय गोलंदाजांना तिसरी विकेट मिळवण्यात यश आले आहे. मोहम्मद शमीने एबी डिव्हिलिअर्सला ८० धावांवर बाद केले आहे.
२ बाद ३ धावा अशी अवस्था असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने पुढे डिव्हिलिअर्स आणि डीन एल्गारच्या फलंदाजीच्या जोरावर १४१ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी तोडण्याचा भारतीय गोलंदाज कालपासून प्रयत्न करत होते [परंतु आज अखेर डिव्हिल्लर्सच्या बाद होण्यामुळे ती भागीदारी तुटली.
त्याने १२१ चेंडूत ८० धावा केल्या. यात त्याच्या १० चौकारांचा समावेश आहे.
सध्या दक्षिण आफ्रिकेकडे १७२ धावांची आघाडी आहे. मैदानावर डीन एल्गार ६० तर फाफ डुप्लेसी व धावांवर खेळत आहेत.