---Advertisement---

मोहम्मद शमीच्या गाडीत पत्नीला मिळाले कंडोम्स (contraceptive) आणि फोन

On: बुधवार, मार्च 7, 2018 1:59 PM
---Advertisement---

मुंबई : भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पत्नीने त्याच्यावर अनैतिक संबंधाचे गंभीर आरोप केले आहेत. तिने हे आरोप करताना फेसबुकवर ७ ते ८ पोस्ट लिहील्या आहेत. 

मोहम्मद शमीच्या पत्नीचे नाव हसीनजहां असे असून तिने शमीच्या फेसबुक आणि वाॅट्सअॅप चटींगचेही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. 

यात तिने काही महिलांचे सरळ मोबाईल क्रमांक देत तर काही तरुणींसोबतचे शमीचे फोटो शेअर करत पोस्ट लिहील्या आहेत. 

ABP NEWS वरील एका वृत्तानूसार हसीनजहांने मोहम्मद शमीच्या गाडीत male contraceptives हे लपवलेले पाहीले असून त्यात एक मोबाईलही सापडला. 

हा मोबाईल तेव्हा लाॅक होता. परंतू वेगवेगळे पॅटन वापरुन तिने तो फोन अनलाॅक केला. 

” मला माहीत आहे की हा फोन त्याला दिल्ली डेअरडेविल्सने २०१४ साली गिफ्ट दिला होता. परंतु तो हे कायम नाकारत आला आहे. ” असे ती म्हणाली. 

“मी जे काही पोस्ट केले आहे ते काहीच नाही. त्याच  वागणं यापेक्षा खूप खराब आहे. त्याचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध आहेत. ” असा गंभीर आरोप तिने केला आहे. 

हसीनजहां आता शमी आणि त्याच्या परिवारावर कायदेशीर कारवाई करणार आहे. त्यांनी तिला २ पेक्षा जास्त काळ त्रास दिल्याचं तिच म्हणणं आहे. 

मोहम्मद शमी सध्या इंडीया ‘अ’ कडून खेळत असुन देवधर ट्राॅफीचे हे सामने धरमशाला येथे सुरू आहेत. त्याने भारताकडून ३० कसोटी, ५० वनडे आणि ७ टी२० सामने खेळले आहेत. 

असे असले तरी काल मात्र  शमीच्या फेसबुक पेजवर मात्र एक लेख शेअर करण्यात आला असून ज्यात त्याने विराट कोहलीचे कर्णधार म्हणून कौतुक केलेले दिसते. 

२०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मोहम्मद शमीने २०१४ मध्ये लग्न केले होते. २४ जानेवारी २०१८ रोजी तो भारताकडून शेवटचा कसोटी सामना खेळला आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment