भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने प्रदीर्घ कालावधीनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. अलीकडेच त्याने रणजी ट्रॉफी सामन्यात बंगालकडून खेळताना सात विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण तो दुखापतीतून परतत आहे आणि संघ व्यवस्थापनाला त्याच्या पुनरागमनाची घाई नाही. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शमीला आगामी आयपीएल लिलावात मोठी बोली लागणार नाही. असा विश्वास माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केला.
संजय मांजरेकर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले “संघ नक्कीच त्याच्यासाठी बोली लावतील,” पण शमीचा दुखापतीचा इतिहास आणि त्याच्या आधीच्या दुखापतीतून पुनरागमन करण्यासाठी लागणारा बराच वेळ लक्षात घेता त्याला मोसमाच्या मध्यात दुखापत होण्याची शक्यता आहे. जर एखाद्या फ्रँचायझीने त्याच्यावर खूप पैसा खर्च केला आणि त्याला हंगामाच्या मध्यात तो बाहेर पडल्यास, तर त्यांच्याकडे खूप कमी पर्याय असतील आणि त्यामुळे त्याचे मूल्य खाली येऊ शकते.
घोट्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर शमी एका वर्षाच्या कालावधीनंतर स्पर्धात्मक खेळात परतला. त्याने मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात बंगालसाठी प्रभावी कामगिरी केली आणि सात विकेट्स घेत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आता मोहम्मद शमी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळताना दिसणार आहे. मात्र, शमीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळू शकते. असे अनेक अहवाल समोर आले होते.
आयपीएल 2023 मध्ये, मोहम्मद शमी या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने 17 डावात 28 विकेट घेतल्या होत्या. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दुखापत होण्यापूर्वी, शमी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता आणि त्याने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चमक दाखवली. तथापि, शमीने गेल्या काही महिन्यांत फक्त काही सामने खेळले आहेत आणि यामुळे फ्रँचायझी त्याच्यासाठी मोठी बोली लावणार नाहीत. 2022-23 मध्ये तो गुजरात टायटन्सचा एक भाग होता. ज्यामध्ये त्याला संघाने 6.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
हेही वाचा-
इशांत शर्माला टीममध्ये स्थान, अचानक संघ जाहीर; आयपीएलपूर्वी या स्पर्धेत खेळणार!
आयपीएल लिलावापूर्वी हार्दिक पांड्या मैदानात, 8 वर्षांनंतर ही स्पर्धा खेळणार
IND VS AUS; माजी क्रिकेटपटूने निवडली पर्थ कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन!