---Advertisement---

आयपीएलमध्ये इतक्या फ्रँचायझी, त्यांचे इतके बॉलर… पण शमीने गुजरातसाठी जे केले ते ऐतिहासिकच

On: सोमवार, मार्च 28, 2022 8:44 PM
Mohammad-Shami
---Advertisement---

सोमवारी (२८ मार्च) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एकाच नावाचा नाद घुमत होता, तो म्हणजे मोहम्मद शमी याचा. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स, या पहिल्यांदाच आयपीएलच्या रणसंग्रामात उतरलेल्या फ्रँचायझींमध्ये पंधराव्या हंगामातील चौथा सामना झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरात संघाने प्रथम गोलंदाजी निवडली. कर्णधार हार्दिक पंड्याच्या या निर्णयाला गुजरातचा वेगवान गोलंदाज शमी याने योग्य सिद्ध केले. त्याने सामन्यातील पहिल्याच चेंडूवर विरोधी लखनऊ संघाची मोठी विकेट घेत इतिहास रचला आहे.

गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडल्यामुळे लखनऊकडून कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि क्विंटन डी कॉक सलामीला फलंदाजीसाठी आले होते. तर गुजरातकडून वेगवान गोलंदाज शमी (Mohammad Shami) पहिले षटक टाकत होता. त्याच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर राहुलने फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू बॅटच्या आऊटसाईड एजला लागून यष्टीच्या मागे यष्टीरक्षक मार्क वूडच्या हातात घेतला. त्याने वेळ न दवडता राहुलचा अचूक झेल टिपला.

पहिल्याच चेंडूवर एकही धाव न घेता बाद झाल्यावर राहुलने त्वरित डीआरएससाठी अपील केली. परंतु पंचांनी रिव्ह्यूमध्ये तपासणी केल्यानंतरही तो बाद असल्याचेच आढळले. परिणामी राहुलला शून्यावर तंबूत परतावे (KL Rahul Golden Duck) लागले.

https://twitter.com/IPL/status/1508446206779072515?s=20&t=z0VNJVz_qgoafJ_KNJu-NQ

यासह शमी सध्या आयपीएलमधील कोणत्या सक्रिय फ्रँचायझीच्या पहिल्याच सामन्यातील पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा एकमेव गोलंदाज बनला (Only Bowler To Take Wicket On A Franchise First Match’s First Ball) आहे. शमीपूर्वी ग्रॅमी स्मिथ यांनी हा पराक्रम केला होता. २०११ मध्ये पुणे वॉरियर्स फ्रँचायझीकडून खेळताना त्यांनी पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती. परंतु आता हा संघ आयपीएलमध्ये खेळत नाही. त्यामुळे हा विक्रम शमीच्या नावावर नोंदवला गेला आहे. 

पावरप्लेमध्ये शमीच्या गोलंदाजीचा जलवा
दरम्यान शमीने लखनऊ विरुद्ध गुजरात सामन्यातील पावरप्लेमध्ये धुमाकूळ घातला. त्याने सामन्यातील पहिल्याच चेंडूवर लखनऊचा कर्णधार राहुलला शून्यावर झेलबाद केले. त्यानंतर ७ धावांवर खेळत असलेला क्विंटन डी कॉक त्याची शिकार ठरला. त्याने तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर डी कॉकला त्रिळफाचीत केले. तर ४.३ षटकात मनिष पांडेला ६ धावांवर त्रिफळाचीत करत पावरप्लेची समाप्ती केली.

महत्त्वाच्या बातम्या-

व्हॉट अ स्टार्ट! शमीने सर्वांच्याच उंचावल्या भुवया, पहिल्याच चेंडूवर लखनऊचा कर्णधार ‘गोल्डन डक’

महान फिरकीपटूने इशान किशनला म्हटले ‘अद्भुत’ खेळाडू, जुना किस्सा सांगत उधळली स्तुतीसुमने

Video: रातोरात आरसीबीचा ‘हा’ शिलेदार हिरोपासून बनला झिरो! संघाला नेऊन ठेवले पराभवाच्या उंबरठ्यावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---