साउथँम्पटन। शनिवारी(22 जून) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात 28 वा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात पार पडला. द रोज बॉल स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने 11 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने शेवटच्या षटकात हॅट्रिक घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
या सामन्यात अफगाणिस्तानला शेवटच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज होती. तसेच त्यांच्या हातात 3 विकेट्स बाकी होत्या. यावेळी भारताकडून या शेवटच्या षटकात मोहम्मद शमीने गोलंदाजी केली.
त्याने या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर 52 धावांवर खेळणाऱ्या नबीला बाद केले. त्याच्या पुढील दोन चेंडूवर शमीने अनुक्रमे अफताब आलम आणि मुजीब उर रेहमानला शुन्य धावेवर त्रिफळाचीत केले आणि त्याची विश्वचषकातील पहिली हॅट्रिक साजरी केली.
त्याचबरोबर वनडे विश्वचषक इतिहासातील ही एकूण 10 वी हॅट्रिक आहे. तर विश्वचषकात हॅट्रिक घेणारा शमी एकूण नववा तर भारताचा दुसरा गोलंदाज आहे. याआधी भारताकडून 1987 च्या विश्वचषकात चेतन शर्माने न्यूझीलंड विरुद्ध खेळताना हॅट्रिक घेतली होती. विशेष म्हणजे ही विश्वचषक इतिहासातील पहिलीच हॅट्रिक होती.
याबरोबर विश्वचषकात आत्तापर्यंत फक्त लसिथ मलिंगाला दोन वेळा हॅट्रिक घेण्यात यश आले आहे. त्याने 2007 आणि 2011 च्या विश्वचषकात हॅट्रिक घेण्याची कमाल केली आहे. अन्य 8 गोलंदाजांना प्रत्येकी एकदा विश्वचषकात हॅट्रिक घेता आली आहे.
आत्तापर्यंत या गोलंदाजांनी घेतली आहे विश्वचषकात हॅट्रिक –
1987 – चेतन शर्मा (भारत)
1999 – सक्लेन मुश्ताक (पाकिस्तान)
2003 – चामिंडा वास (श्रीलंका)
2003 – ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया)
2007 – लसिथ मलिंगा (श्रीलंका)
2011 – केमार रोच (विंडीज)
2011 – लसिथ मलिंगा (श्रीलंका)
2015 – स्टिव्हन फिन (इंग्लंड)
2015 – जेपी ड्युमिनी (दक्षिण आफ्रिका)
2019 – मोहम्मद शमी (भारत)
Mohammed Shami joins an elite club as he becomes the ninth player to take a hat-trick in men's World Cups! 👏#CWC19 | #TeamIndia pic.twitter.com/X3wWKCa90B
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 22, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–मोहम्मद शमीने घेतली विश्वचषक २०१९ मधील पहिली हॅट्रिक, पहा व्हिडिओ
–२७ वर्षांनंतर भारतीय कर्णधाराने विश्वचषकात केली अशी कामगिरी
–वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदाच घडली अशी घटना!