पर्थ कसोटीपूर्वी टीम इंडिया अडचणीत आली आहे. भारताला 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिला सामना खेळायचा आहे. मात्र याआधी भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासलंय.
काल (16 नोव्हेंबर) शुबमन गिलच्या बोटाला फ्रॅक्चर झालं. तो पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. कर्णधार रोहित शर्माही पत्नीच्या बाळंतपणामुळे पहिल्या कसोटीत खेळणार नाही. यादरम्यान युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलसाठी आनंदाची बातमी आली आहे. एका रिपोर्टनुसार, तो टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो. पडिक्कल आणि मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल सध्या चर्चा सुरू आहे.
वास्तविक, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र तो आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. शमीनं अलीकडेच रणजी ट्रॉफीमध्ये शानदार पुनरागमन केलं. येथे त्यानं आपल्या जुन्या लयीत गोलंदाजी करत विकेट्सही घेतल्या. शमीनं क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केलं असलं, तरी त्याला टीम इंडियामध्ये जागा मिळवण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल.
‘क्रिकबझ’च्या वृत्तानुसार, बीसीसीआय शमीला सध्याच ऑस्ट्रेलियाला पाठवण्याच्या मूडमध्ये नाही. बोर्डानं त्याला आणखी काही देशांतर्गत सामने खेळण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे शमी आता आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सहभागी होऊ शकतो. तेथे जर त्यानं चांगली कामगिरी केली, तर त्याला भारतीय संघात संधी मिळू शकते.
दुसरीकडे, डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कलसाठी एक आनंदाची बातमी आहे. पडिक्कल सध्या ऑस्ट्रेलियात आहेत. तो भारत ‘अ’ संघाकडून खेळतोय. पडिक्कलनं ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध एका डावात 36 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात 88 धावा केल्या. रिपोर्टनुसार, टीम इंडिया पडिक्कलला ऑस्ट्रेलियातच थांबवू शकते. भारत अ संघ पुढील 24 तासांत मायदेशी रवाना होणार आहे. मात्र पडिक्कल ऑस्ट्रेलियातच थांबू शकतो.
हेही वाचा –
पाकिस्तानी चाहत्यांनी भर मैदानात बाबर आझमची लाज काढली, ट्रोल करतानाचा VIDEO व्हायरल
आर अश्विन मोडू शकतो कपिल देवचा मोठा रेकॉर्ड, फक्त मालिकेत संधी मिळायला हवी!
“बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकायची असेल, तर विराटला…”, मायकेल क्लार्कची कोहलीबाबत मोठी प्रतिक्रिया