स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे गेल्या बऱ्याच काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र आता तो पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.
शमी नुकताच एका नव्या लूकमध्ये दिसला. त्यानं प्रसिद्ध न्हावी अलिम हकिमकडून केस कापून घेतले आहेत. शमीपूर्वी आलिम यांनी विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीचेही केस कापले होते. एका रिपोर्टनुसार, अलिम हकिम एकदा केसं कापण्याचे सुमारे 1 लाख रुपये घेतात. केस कापल्यानंतर शमीनं त्याच्या नवा लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
अलिम हकिम देशातील फार मोठे स्टायलिस्ट मानले जातात. मोहम्मद शमी हेअर कट करण्यासाठी त्यांच्याकडे पोहचला होता. शमीनं त्यांच्याकडे केस कापले आणि न्यू लूकचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. शमीनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, “न्यू लूक, सेम हसल”. बातमी लिहिपर्यंत त्याच्या या फोटोला 7 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं होतं.
View this post on Instagram
अलीम हकीम यांनी टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंची स्टाईल केली आहे. ‘ब्रूट इंडिया’शी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की, ते एका सेशनसाठी सुमारे एक लाख रुपये चार्ज करतात. आलिम विराट कोहलीच्या हेअरकटनंतर प्रकाशझोतात आले होते. यानंतर त्यांच्याकडून युवराज सिंग, सूर्यकुमार यादव, बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी, रणवीर सिंग, विकी कौशल आणि हार्दिक पांड्या यांच्यासह अनेकांनी हेअर कट करून घेतले आहेत.
मोहम्मद शमीबद्दल बोलायचं झालं तर, तो 2023 विश्वचषकापासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. यादरम्यान त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता तो पुनरागमनासाठी पूर्णपणे तयार आहे.
हेही वाचा –
रोहित शर्मा बनेल सचिन तेंडुलकरपेक्षाही मोठा सलामीवीर, शतकांचा हा विक्रम मोडून रचेल इतिहास!
चेतेश्वर पुजारासोबत हे काय घडतंय! भारतीय संघापाठोपाठ या विदेशी संघानंही दाखवला बाहेरचा रस्ता
क्रिकेटमध्ये भारतीयांचा दबदबा! ऑस्ट्रेलियन संघात 3 भारतीय वंशाच्या खेळाडूंची एन्ट्री