भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे स्टार फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मासोबत चांगले संबंध आहेत. सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या शमीनं विराट आणि रोहितच्या एका रहस्याचा पर्दाफाश केला आहे. शमी म्हणाला की, या दोघांना नेटमध्ये त्याच्याविरुद्ध फलंदाजी करणं अजिबात आवडत नाही. शमीनं असाही दावा केला आहे की, विराट नेटमध्ये आऊट झाल्यावर चिडतो आणि ‘हिटमॅन’ त्याच्याविरुद्ध फलंदाजीला नकार देतो.
एका पॉडकास्टमध्ये शमीला विचारण्यात आलं की, विराट आणि रोहितपैकी कोणाला नेटमध्ये गोलंदाजी करणं अवघड आहे? यावर शमीनं हसत उत्तर दिलं, “त्यांना माझ्याविरुद्ध खेळायला आवडत नाही. विराट आणि मी एकमेकांना आव्हान देतो. त्याला चांगले फटके मारायला आवडतात आणि मला त्याला बाद करायला आवडतं. आमच्यामध्ये एक प्रकारची मैत्री आहे. आम्ही या सर्व गोष्टींचा खूप आनंद घेतो. रोहित तर आधीच सांगतो की तो माझ्याविरुद्ध खेळणार नाही. तर विराट एक-दोनदा आऊट झाल्यावर चिडतो.”
विराट आणि इशांत शर्मा हे त्याचे चांगले मित्र असल्याचंही मोहम्मद शमीनं सांगितलं. शमी म्हणाला, ”विराट आणि इशांत माझे चांगले मित्र आहेत. जेव्हा मी दुखापतग्रस्त होतो, तेव्हा ते मला सतत फोन करून माझी विचारपूस करायचे.”
मोहम्मद शमी 2023 एकदिवसीय विश्वचषकापासून भारतीय संघाबाहेर आहे. शमीच्या टाचेला दुखापत झाली असून, फेब्रुवारीमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शमीनं विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली होती. त्यानं 7 सामन्यांमध्ये सर्वाधिक 24 विकेट घेतल्या होत्या.
शमी सध्या पुनरागमनासाठी खूप मेहनत घेत आहे. स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी त्यानं नेटमध्ये गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत शमी भारतीय संघात पुनरागमन करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
सर्वांच्या नजरा सूर्यकुमार यादववर! कर्णधार बनवण्यासाठी प्रयत्न करतील या 3 आयपीएल फ्रँचायजी
एकच मन किती वेळा जिंकशील स्मृती! भारतीय सलामीवीर मंधानाचं जगभरात होतंय कौतुक
“मी यापेक्षा अधिक काय करू”, मोहम्मद शमीचा टीम मॅनेजमेंटला सवाल; विश्वचषकात मिळाली नव्हती संधी