भारताला 2024चा टी20 विश्वचषक (T20 World Cup) जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मानं फलंदाजीपासून ते कर्णधारपदापर्यंत आपलं कर्तृत्व जगभर सिद्ध केलं. मैदानावरही त्याच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात. रोहितचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये तो सामन्यादरम्यान खेळाडूंसोबत मस्ती करताना किंवा खिल्ली उडवताना दिसतो. तत्पूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे भारतीय संघातून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं (Mohammed Shami) मैदानावरील रोहितच्या स्वभावाबद्दल मोठा खुलासा केला आहे.
शमीनं मैदानावरील रोहितच्या स्वभावाविषयी वक्तव्य केलं आहे. शमीनं सांगितलं की, रोहित सर्व खेळाडूंना स्वातंत्र्य देतो, पण जर कोणी त्याच्या अपेक्षा पूर्ण करत नसेल, तर त्याच्या प्रतिक्रिया प्रत्येकाच्या नजरेस पडतात. शमीने सीइएटी क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्स फंक्शन दरम्यान रोहितच्या मैदानावरील वर्तनाबद्दल सांगितले.
शमी म्हणाला, “रोहितची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो तुम्हाला स्वातंत्र्य देतो. त्यानुसार वागला नाही तर काही प्रतिक्रिया त्याच्याकडून येऊ लागतात. तो तुम्हाला सांगेल की, तुम्हाला हे करावे लागेल, होय तुम्ही हे करायला हवं होतं. तेही जमलं नाही तर पडद्यावर जी प्रतिक्रिया दिसते, जी न बोलता समजते, ती येऊ लागते.”
मोहम्मद शमीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं भारतासाठी 64 कसोटी, 101 एकदिवसीय आणि 23 टी20 सामने खेळले आहेत. 64 कसोटी सामन्यात त्यानं 27.11च्या सरासरीनं 229 विकेट्स घेतल्या आहेत. 101 एकदिवसीय सामन्यात शमीनं 23.68च्या सरासरीनं 195 विकेट्स त्याच्या नावावर केल्या, तर 23 टी20 सामन्यात त्यानं 24 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
शिखर धवनप्रमाणेच ‘या’ 5 भारतीय खेळाडूंनाही फेअरवेल मॅच खेळण्याची मिळाली नाही संधी
“तो प्रत्येक चेंडूनंतर ओरडतो” अंपायर अनिल चौधरीनं ‘या’ यष्टीरक्षकाची उडवली थट्टा! VIDEO
बाप झाल्याबद्दल अर्शद नदीमने शाहीनला दिल्या खास शुभेच्छा, ‘गोल्डन बॉय’चा संदेश मन जिंकेल