भारतीय क्रिकेट संघात एक असा खेळाडू आहे ज्याने परिस्थितीवर मात करत जागतिक क्रिकेटमध्ये आपला बोलबाला निर्माण केला आहे. राष्ट्रीय क्रिकेट संघात पदार्पण करण्यापूर्वी तो स्मशानभूमीमध्ये गोलंदाजीचा सराव करायचा. त्याच खेळाडूंची गणना आज दिग्गज गोलंदाजांमध्ये केली जाते. मोहम्मद शमी असे त्याचे नाव आहे. जो की आज भारतीय संघातला प्रमुख गोलंदाज आहेत.
मोहम्मद शमीचा जन्म उत्तर प्रदेशातल्या अमरोहा मधील सहसपूर अलीनगर गावामध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. त्याला लहानपणापासून क्रिकेटचे वेड होते. प्रतिकूल परिस्थितीतही त्याने क्रिकेटर होण्याचे स्वप्न पाहिले होते.
विशेष म्हणजे वेगवान गोलंदाजीचे आकर्षण त्याला होते. घरातल्या अंगणात तो लहानपणापासून वेगवान गोलंदाजीचा सराव करायचा. शमीच्या घरा पाठीमागे एक स्मशनाभूमी होती. या स्मशानभूमीत त्यांचे बालपण गेले. तो दिवसभर येथे क्रिकेट खेळत रहायचा. लहानपणी टेनिसबॉलने गोलंदाजी करून फलंदाजांना चांगले सतावायचा.
मोहम्मद शमीने जेव्हा लेदर बॉलवर क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली तेव्हा बदर अहमद या प्रशिक्षकांचे सहकार्य मिळाले. त्यांनी शमीला गोलंदाजीचे धडे दिले. 140 किमी. वेगाने शमी गोलंदाजी करत होता. वेग हेच त्याचे प्रमुख अस्त्र होते. आपल्या वेगाने तो अनेक फलंदाजांमध्ये धडकी भरवायचा. शमीने उत्तर प्रदेशच्या संघाकडून खेळण्यासाठी ट्रायल दिले होते. मात्र, त्याची निवड झाली नाही. युपीकडून क्रिकेट खेळण्यास संधी मिळत नसल्याने त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला कोलकाताच्या क्लबमध्ये खेळण्याची खेळण्याचा सल्ला दिला. शमीने थेट कोलकाता गाठले.
मोहम्मद शमीने कोलकाता येथे जाऊन तेथे गोलंदाजीचा सराव करू लागला आणि त्याचे आयुष्य बदलून गेले. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर सौरव गांगुली फलंदाजीच्या सरावासाठी आला होता. शमीला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. शमीने आपल्या भेदक गोलंदाजीने सौरव गांगुलीला खूपच त्रास दिला. त्यानंतर गांगुलीने बंगाल क्रिकेट संघ व्यवस्थापनास शमीवर विशेष नजर ठेवण्यास सांगितले. त्यानंतर मोहम्मद शमीने आपल्या गोलंदाजीच्या जीवावर २०१०मध्ये बंगाल क्रिकेट संघांमध्ये स्थान मिळवले. त्यानंतर तो 2013 साली भारतीय संघातला हिस्सा बनला.
मोहम्मद शमीने आतापर्यंत 49 कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर 180 बळींची नोंद आहे. यासोबतच 77 वनडे सामन्यात त्याने 144 बळी टिपले. आज शमी भारतीय क्रिकेट संघातला नव्हे तर जगातला सर्वात खतरनाक गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीला कोणतीच तोड नाही. जुन्या चेंडूने विकेट घेण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. अलीकडे काही वर्षांत झालेल्या कसोटी सामन्यात भारताने जे विजय मिळवले त्यात मोहम्मद शमीचे सर्वाधिक योगदान आहे.






