भारतीय क्रिकेटपटूंना महागड्या कारचे, गाड्यांचे कलेक्शन करण्याची फार आवड आहे. एमएस धोनीपासून ते सचिन तेंडूलकरपर्यंत भारतीय क्रिकेटपटूंकडे एकाहून एक महागड्या आणि भारी गाड्या आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यानेही नुकतीच त्याच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये नव्या लग्जरी कारची भर घातली आहे. शमीने एफ-टाइप स्पोर्ट्स जॅग्वार कार विकत घेतली आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच नवी रॉयल इनफिल्ड मोटारबाईकही विकत घेतली होती.
शमीच्या या नव्या कारची शोरूम किंमत तब्बल ९८.१३ लाख रुपये इतकी आहे. त्याने खरेदी (Shami Purchased luxury car) केलेल्या कारची विशेषता अशी की, भारतात जॅग्वार एफ टाइप कार (F-type sports Car) फक्त ३ मॉडलमध्ये उपलब्ध आहेत. यातील सर्वात उच्च दर्जाचे मॉडल ५.० आय व्ही८ कनव्हर्टेबल हे आहे, ज्याची किंमत १ कोटी ५३ लाख रूपये इतकी आहे. तर तिसरे मॉडल एफ-टाइप एल व्ही८ काउप आर डायनामिक आहे. या मॉडलची किंमत १ कोटी ४३ लाख रुपये इतकी आहे.
तसेच कंपनी आणखी एक नवे मॉडल बाजारात आणणार आहे. या नव्या मॉडलचे नाव एफ टाइप आर डायनामिक ब्लॅक मॉडल आहे आणि याची किंमत १ कोटी ३७ लाख रुपये आहे.
शमीने विकत घेतलेली कार ही एक स्पोर्ट्स कार असून ती ३.७ सेकंदात १०० च्या वेगाने पळते. या कारमध्ये लावण्यात आलेले इंजिन हे अतिशय ताकदवान असून त्याचे नाव व्ही८ ३३१ केडब्ल्यू आहे. या इंजिनमुळेच ही कार इतक्या कमी सेकंदात १०० चा वेग पकडते. ऑनरोड या कारची किंमत १ कोटीपेक्षा जास्त असू शकते. या कारमध्ये ८ वेगापर्यंत ऑटोमॅटिक गियरबॉक्स आहे.

शमीने काही दिवसांपूर्वीच विकत घेतलीय बाईक
शमीने याचवर्षी जून महिन्यात नवी रॉयल एनफिल्ड कॉन्टिनेंटल जीटी ६५० बाईक विकच घेतली होती. या बाईकची शोरूम किंमत ३.३२ लाख रुपये आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अभिमानास्पद! नीरज चोप्राने रचला इतिहास, World Athletics Championshipमध्ये जिंकले रौप्य पदक
अबब! एकट्यानेच चोपल्या ४५० चेंडूत नाबाद ४१० धावा; १८ वर्षानंतर झाली लारासारखी कामगिरी
चहल भाऊ लईच नशीबवान! चाहते तर सोडाच आता पत्नीच म्हणाली, “मीच तुझी सर्वात मोठी…”






