मोहम्मद शमी 2023 एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्यापूर्वीच्या 2019 विश्वचषकातही त्यानं खळबळ उडवून दिली होती. मात्र शमीचं दुर्दैवं असं की, टीम इंडियाच्या मॅनेजमेंटनं त्याला महत्त्वाच्या प्रसंगी प्लेईंग इलेव्हनमध्येही स्थान दिलं नाही. आता शमीनं या विषयावर आपलं मौन तोडत मोठं विधान केलं आहे.
मोहम्मद शमीनं 2019 एकदिवसीय विश्वचषकात केवळ 4 सामने खेळून 14 विकेट घेतल्या होत्या. याच कामगिरीची आठवण करून शमी म्हणाला, “मी 2019 च्या विश्वचषकात पहिले 4-5 सामने खेळले नव्हते. पुढच्याच सामन्यात मी हॅट्ट्रिक घेतली आणि त्यानंतर 5 बळी घेतले. पुढच्या सामन्यात मी 4 बळी घेतले. 2023 मध्येही असंच काहीसं घडले होतं. मी पहिल्या काही सामन्यात खेळलो नाही. मात्र संघात येताच मी एका सामन्यात 5 बळी घेतले. त्यानंतरच्या सामन्यात 4 आणि पुढच्या सामन्यात 5 बळी घेतले.”
मोहम्मद शमी पुढे बोलताना म्हणाला, “मी अनेकदा विचार करतो की, प्रत्येक संघाला अशा खेळाडूंची गरज आहे, जे चांगले प्रदर्शन करू शकतील. मी 3 सामन्यात 13 विकेट घेतल्या होत्या. मी यापेक्षा अधिक काय करू?” मोहम्मद शमीनं 2019 एकदिवसीय विश्वचषकात 4 सामन्यात 14 विकेट घेतल्या होत्या. तरीही श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याला संघातून वगळण्यात आलं होतं.
मोहम्मद शमी एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्यानं केवळ 18 सामन्यांमध्ये 55 विकेट्स घेतल्या आहेत. तो विश्वचषकाच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक वेळा 5 बळी घेणारा गोलंदाज आहे. शमीनंतर सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत झहीर खान दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यानं 23 सामन्यात 44 विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
प्रशिक्षक बनताच गंभीरने काढला धोनीवरचा राग? टीम इंडियातून सीएसकेचे चौघे ‘क्लिन बोल्ड’, सोशल मीडियावर चर्चा
क्रिकेटच्या मैदानात चक्क कोल्होबाची एंट्री! सैरभैर धावून केलं प्रेक्षकांचं मनोरंजन, एकदा VIDEO पाहाच
‘हिम्मत असेल तर…’, मोहम्मद शमीने सानिया मिर्झासोबत लग्नाबाबतच्या अफवांवर तोडले मौन