---Advertisement---

पाकिस्तानी खेळाडूनं केलेल्या बाॅल टेम्परिंगच्या आरोपावर, मोहम्मद शमीचे तिखट उत्तर

On: शनिवार, जुलै 20, 2024 7:21 PM
Mohammed Shami
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकावर (ICC T20 World Cup) भारतानं तब्बल 13 वर्षानंतर नाव कोरले. तत्पूर्वी 2024च्या टी20 विश्वचषकादरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकनं (Inzamam-ul-Haq) भारतीय संघावर बॉल टेम्परिंगचे गंभीर आरोप केले होते. यावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं (Mohammed Shami) इंझमाम उल हकच्या आरोपांना तिखट प्रत्युत्तर दिलं आहे.

मोहम्मद शमी (Mohammed Shami) म्हणाला, “पाकिस्तानी आमच्यावर कधीच खूश नव्हते आणि कधीच होणार नाहीत. तो म्हणाला की चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान मध्ये गेलो तर चेंडू रिव्हर्स स्विंग कसा होतो ते सांगेन.”

शुभंकर मिश्रासोबत युट्यूबवर झालेल्या मुलाखती मध्ये शमी म्हणाला की, “भारत-पाकिस्तानचा छत्तीसचा आकडा आहे. पाकिस्तानी आमच्यावर कधीच खूश नव्हते आणि कधीच राहणार नाहीत. त्याच्याविरुद्ध चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ते निशाण्यावर धरतात.” इंझमामनं अर्शदीपवर केलेल्या बॉल टेम्परिंगच्या आरोपावर शमी म्हणाला, “रिव्हर्स स्विंग होण्यासाठी तुम्ही चेंडू चाकूने कापून किंवा कुठेतरी घासून आणू शकत नाही.”

 

पुढे बोलताना मोहम्मद शमी म्हणाला, “रिव्हर्स स्विंग हा आपोआप होत असतो. फक्त चेंडू चांगला बनवावा लागतो, हे त्यालाही माहीत आहे आणि जगालाही माहीत आहे. मैदानात चाळीस कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे अर्शदीपचे काय, कोणताही गोलंदाज चेंडूशी छेडछाड करु शकत नाही. जर आम्ही 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी गेलो तर मी पंचायत बोलावून त्यांना सांगेन की कोणता चेंडू कट करायचा. पाकिस्तानी खेळाडूंनी इतरांमध्ये दोष शोधण्यापेक्षा चांगला संघ बनवा.”

महत्त्वाच्या बातम्या-

टी20 विश्वचषक 2026 मध्ये विराट आणि रोहितची जागा कोण घेणार? माजी क्रिकेटपटूने सांगितली 4 नावे
“रोहित माझ्याविरुद्ध फलंदाजीला घाबरतो, विराट आऊट झाल्यावर चिडतो”; दिग्गज गोलंदाजानं घेतली मजा
नताशाला घटस्फोट दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच हार्दिक पांड्या आणि ‘ही’ अभिनेत्री इन्स्टावर बनले फ्रेंड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---