वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (WIvsIND) यांच्यात दुसरा वनडे सामना रविवारी (२४ जुलै)त्रिनिदादच्या पोर्ट ऑफ स्पेन येथे रंगला. या रोमांचक सामन्यात भारताने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. क्विन्स पार्क ओव्हलवर झालेला हा सामना भारताने २ विकेट्सने जिंकत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. यावेळी अर्धशतकी खेळी करणारा भारताचा यष्टीरक्षक संजू सॅमसनने पहिल्या सामन्याप्रमाणे या ही सामन्यात त्याच्या उत्तम यष्टीरक्षणाचे कौशल्य दाखवले आहे.
या दौऱ्याच्या पहिल्या वनडे सामन्यात संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत, मात्र त्याने त्या सामन्यात अप्रतिम यष्टीरक्षण केले आहे. दुसऱ्या सामन्यातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असताना त्याने यष्टीरक्षकाची भुमिका चोख पार पाडली आहे. वेस्ट इंडिज फलंदाजी करत असताना शेवटचे षटक टाकण्यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आला. यावेळी फलंदाज अधिक धावा करण्याच्या प्रयत्नात होते. सॅमसनने यष्टीरक्षणाचा अचूक नमूना दाखवताना चेंडू अडवत काही धावाही वाचवल्या. त्याच्या या यष्टीरक्षणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
Absolute world-class wicket keeping from @IamSanjuSamson. He saved some precious runs for India.
Watch the India tour of West Indies LIVE, only on #FanCode👉 https://t.co/RCdQk1l7GU@BCCI @windiescricket#WIvIND #INDvsWIonFanCode #INDvsWI pic.twitter.com/gqKoHe8Wi9
— FanCode (@FanCode) July 24, 2022
सिराजने टाकलेल्या त्या शेवटच्या षटकातील दोन चेंडू असे होते त्यातून यजमान संघाला चारपेक्षा अधिक धावा मिळाल्या होत्या. त्याचक्षणी सॅमसनने कधी डावीकडे तर कधी उजवीकडे होत ते चेंडू अडवले. या षटकात वेस्ट इंडिजने पाचव्या चेंडूवर षटकार मारत १० धावा वसूल केल्या. वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पुरनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर-यष्टीरक्षक शाय होपच्या शतकी खेळीच्या जोरावर त्यांनी ५० षटकात ६ विकेट्स गमावत ३११ धावा केल्या.
प्रत्युत्तरात भारतीय संघाने ४९.४ षटकात ८ विकेट्स गामवात हे लक्ष्य पार केले आहे. शुबमन गिलने ४३, श्रेयस अय्यरने ६३, सॅमसनने ५४ आणि अक्षर पटेलने नाबाद ६४ धावा केल्या. अक्षरने १८२.८६च्या स्ट्राईक रेटने खेळताना ३५ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकार मारले. तसेच त्याने शमराह ब्रुक्सची विकेटही घेतली. भारताकडून सर्वाधिक विकेट शार्दुल ठाकूरने घेतल्या. त्याने होप, पूरन आणि रोवमन पॉवेलला बाद केले.
या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना बुधवारी (२७ जुलै) याच मैदानावर खेळला जाणार आहे. त्यानंतर भारत या दौऱ्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेंडू मारायचा एकीकडे होता, पण गेला दुसरीकडे; पाहा शुबमन गिलने विचित्र पद्धतीने गमावलेली विकेट
WIvsIND: वनडे मालिका जिंकत कर्णधार धवन दिग्गजांच्या यादीत सामील; रोहितलाही न जमलेला पराक्रम नावे
वेस्ट इंडिजला झुकवत भारताने मिळवला ‘नंबर १’चा ताज, खास विश्वविक्रमात पाकिस्तानला टाकले मागे