भारतीय संघात एकापेक्षा एक वेगवान गोलंदाजांचा भरणा आहे. यामध्ये मोहम्मद सिराज याच्या नावाचाही समावेश होतो. सिराजने मागील 12 महिन्यांमध्ये वनडे क्रिकेटमध्ये विकेट्सचा पाऊस पाडला आहे. त्याने केलेल्या कामगिरीसाठी सिराज आता वनडे क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे. स्वत: आयसीसीने सोशल मीडियाद्वारे सिराज वनडे क्रिकेटमधील गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचल्याची माहिती दिली आहे.
सिराजची वनडेतील कामगिरी
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारताच्या वनडे संघातील गोलंदाजी विभागाचा भाग बनलेल्या मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याची ही मोठी झेप आहे. विशेष म्हणजे, त्याने कारकीर्दीत एकूण 21 वनडे सामने खेळले आहेत. त्यात सिराजने 12 महिन्यात 20 सामने खेळताना 38 विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे 28 वर्षीय सिराज भारताचा सातत्य असलेला वेगवान गोलंदाजही बनला.
🚨 There's a new World No.1 in town 🚨
India's pace sensation has climbed the summit of the @MRFWorldwide ICC Men's ODI Bowler Rankings 🔥
More 👇
— ICC (@ICC) January 25, 2023
बोल्ट- हेजलवूडला मागे टाकत पटकावले अव्वलस्थान
मंगळवारी (दि. 24 जानेवारी) आयसीसी पुरुष वनडे संघात सिराजच्या नावाचा समावेश झाला. त्यानंतर आता बुधवारी (दि. 25 जानेवारी) सिराजने न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट आणि ऑस्ट्रेलियाच्या जोश हेजलवूड या दोन दिग्गज वेगवान गोलंदाजांना मागे टाकले. तसेच, पहिल्यांदाच वनडेत गोलंदाजी क्रमवारीत थेट अव्वलस्थान पटकावले.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर सिराजची रेटिंग ही 729 इतकी झाली आहे. त्यामुळे त्याने वनडेत गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान पटकावले आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी असलेल्या हेजलवूडची रेटिंग ही 727 आणि बोल्टची रेटिंग ही 708 इतकी आहे.
विशेष म्हणजे, सिराजने 12 महिन्यात दमदार कामगिरी केली आहेच. मात्र, या महिन्याच्या सुरुवातीला श्रीलंका आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सिराजने किती सुधारणा केली आहे, हेदेखील दाखवून दिले.
सिराजची श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेतील कामगिरी
सिराजने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत 3 सामने खेळताना 92 धावा खर्च करत सर्वाधिक 9 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. 32 धावा देत 4 विकेट्स ही त्याची यादरम्यानची सर्वोत्तम कामगिरी होती. त्यानंतर त्याने न्यूझीलंडविरुद्ध फक्त 2 सामने खेळले. यामध्ये त्याने 56 धावा खर्च करत 5 विकेट्स घेतल्या. 46 धावा देत 4 विकेट्स ही त्याची यादरम्यानची सर्वोत्तम कामगिरी होती. (Mohammed Siraj became new No.1 ODI bowler)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांची ‘हिटमॅन’ने केली बोलती बंद, व्हिडिओ पाहून बत्त्या होतील गुल
‘या’ गोलंदाजामुळे आख्ख्या न्यूझीलंड संघाची मान शरमेनं खाली, भारतीय फलंदाजांनी धू धू धुतलं