सध्या भारत आणि न्यूझीलंड या संघादरम्यान टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (दि. 22 नोव्हेंबर) नेपियर येथे खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेेक जिंकून फंलदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने सर्वबाद 160 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या, त्याचबरोबर हर्षल पटेल याने 1 विकट घेतली. विशेष म्हणजे सिराजने या 4 विकेट्स फक्त 17 धावा देत घेतल्या. सिराजने या मालिकेेतील खेळल्या गेलेल्या दोन सामन्यात एकूण 6 विकेेट्स घेतल्या.
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा टी20 सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाली. न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ऍलन (Finn Allen) स्वस्तात बाद झाला. तो केवळ 3 धावा करु शकला. भारताच्या मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) ने गोलंदाजीत दैदीप्यमान यश मिळवले आहे. त्याने या सामन्यात न्यूझीलंडच्या 4 फंलदाजांना तंबूत पाठवले. सिराजने मार्क चॅपमन (Mark Chapman), ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips), जिमी नीशम (Jimmy Neesham) आणि मिचेल सॅंटनर (Mitchell Santner) यांना बाद केले.
मोहम्मद सिराज याने या टी20 मालिकेत एकूण 6 गडी बाद केले. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 8 टी20 सामन्यात 11 गडी बाद केले.सिराजने 2017मध्ये न्यूझीलंड विरुद्ध राजकोट येथे आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पदार्पण केले होते. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये देखील त्याने चांगले प्रदर्शन केले आहे.
भारत आणि न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने निर्धारीत 20 षटकात 160 धावा केल्या. या आव्हानाचे उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवातही निराशाजनक झाली. भारतीय फलंदाजीची वरची फळी ठराविक अंतराने ढासाळत गेली. इशान किशन (Ishan Kishan) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) अनुक्रमे 10 आणि 11 धावा करत बाद झाले. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा देखील 13 धावा करत झेल बाद झाला. श्रेयस अय्यर (Shreyas Ayyer) याला तर भोपळा देखील फोडता आला नाही. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना डकवर्थ लुईस नियमाने टाय झाला.(Mohammed Siraj has shined in third T20 match by taking 4 wickets)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जो विक्रम आतापर्यंत कधीही बनला नाही, तो अर्शदीप अन् सिराज जोडगोळीने रचला; एकदा वाचाच
एक हजार दिंवसांची वाट पाहिल्यानंतर वॉर्नरच्या नावावर मोठा विक्रम, दिग्गज मार्क वॉ यांना नुकसान