राजकोट । आज भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० सामन्यात मोहम्मद सिराज या खेळाडूने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. तो भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२० खेळणारा ७१वा खेळाडू ठरला आहे.
भारत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० असा आघाडीवर आहे. भारत आज विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी उत्सुक आहे.
आज सिराजला टी२० कॅप प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिली. यावेळी ह्या खेळाडूला आपला आनंद आणि हास्य लपवता आले नाही. यापूर्वी भारताकडून टी२०मध्ये दिल्ली सामन्यात श्रेयस अय्यरने पदार्पण केले होते.
सिराजला कुणाच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे हे अजून सांगण्यात आले नाही.
(संपूर्ण बातमी थोड्याच वेळात )