अखेर बुधवारपासून (दि. 12 जुलै) विंडसर पार्क येथे वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच कसोटीच्या सुरुवातीच्या सत्रात भारतीय संघाचे पारडे जड राहिले. लंच ब्रेकपर्यंत यजमानांनी 4 विकेट्स गमावत 68 धावा केल्या होत्या. यावेळी भारताकडून आर अश्विन याने कमालीची गोलंदाजी करत वेस्ट इंडिजमध्ये इतिहास रचला. असे असले, तरीही वाहवा लुटली ती, मोहम्मद सिराज याने.
लंच ब्रेकपूर्वी खेळल्या गेलेल्या अखेरच्या षटकात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) गोलंदाजीसाठी आला होता. यावेळी त्याने 1 विकेट आपल्या नावावर केली. झाले असे की, या षटकात जडेजाने मोहम्मद सिराज याच्या हातून जर्मेन ब्लॅकवूड (Jermaine Blackwood) याला तंबूचा रस्ता दाखवला. सिराजने शानदार पद्धतीने झेप घेत हा झेल पकडला. हा झेल पाहून प्रत्येकजण दंग झाला. गोलंदाजी करणारा रवींद्र जडेजाही हैराण झाला. आता या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सिराजने डाईव्ह मारत पकडला झेल
खरं तर, पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाज चमकले. या सत्रात वेस्ट इंडिज संघाने 4 विकेट्स गमावत 68 धावा केल्या होत्या. लंच ब्रेकपूर्वीच्या 28व्या षटकात जडेजाला एक विकेट घेण्यात यश आले. ब्लॅकवूडला जडेजाने वैयक्तिक 14 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. मात्र, ही विकेट घेण्यात जडेजापेक्षा जास्त मेहनत सिराजनेच केली.
MOHAMMAD SIRAJ… YOU BEAUTY!
What a screamer, excellent catch.pic.twitter.com/iAFMvHtUFl
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 12, 2023
षटकातील अखेरचा चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर जात होता. हा चेंडू ब्लॅकवूडला वरच्या दिशेने मारायचा होता, पण मिड ऑफवर उभ्या असलेल्या मोहम्मद सिराजने डाईव्ह मारत एका हाताने अफलातून झेल पकडला. त्याची चपळता पाहून प्रत्येकजण हैराण झाला. हा झेल पकडल्यानंतर सिराज जमिनीवर झोपला. त्याला असे पाहून असे वाटले की, कदाचित त्याच्या कोपराला दुखापत झाली असावी. यादरम्यान जडेजा सिराजच्या जवळ पोहोचला आणि त्याची विचारपूस केली. आता हा व्हिडिओ व्हायरल होतोय. तसेच, चाहतेही सिराजचे कौतुक करत आहेत.
???? ????
That MOMENT when @mdsirajofficial took a blinder of a catch ???? ????
Follow the match ▶️ https://t.co/FWI05P4Bnd #TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/reVWZJ4PHo
— BCCI (@BCCI) July 12, 2023
भारतीय संघ 70 धावा मागे
भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिज संघाला पहिल्या डावात अवघ्या 150 धावांवर सर्वबाद केले. यानंतर भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी पदार्पणवीर यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उतरले. या दोघांनीही टिच्चून फलंदाजी केली. यावेळी दोघांच्या खेळीमुळे भारताने दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 80 धावा केल्या. यामध्ये जयसवालच्या नाबाद 40 आणि रोहितच्या नाबाद 30 धावांचा समावेश आहे. (mohammed siraj took one handed stunning catch in first session ind vs wi ravindra jadeja in shocked see video )
महत्वाच्या बातम्या-
रोहितच्या एकाच निर्णयामुळे ‘या’ खेळाडूचं करिअर उद्ध्वस्त? 2 वर्षांनी केलं होतं कमबॅक
कधीच न थांबणारा रविचंद्रन अश्विन! वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्याच कसोटीत मिळवले खास यादीत स्थान