२०२१ वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत, अशात भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाजी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा वेगवाग गोलंदाज मोहित शर्मा (mohit sharma) याला पुत्ररत्न प्राप्त झाला आहे. मोहितची पत्नी श्वेता शर्माने सोमवारी (२७ डिसेंबर) मुलाला जन्म दिला. मोहित शर्माच्या घरी एक नवीन लहान सदस्य आल्याची माहिती त्याने स्वतः दिली आहे. मोहितने चाहत्यांना ही माहिती स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्रमा खात्यावरून दिली आहे. पोस्टमध्ये लहान बाळाने त्याचा हात पकडल्याचे दिसत आहे.
मोहित शर्माने ही आनंदाची बातमी इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर आतापर्यंत जवळपास चार हजारपेक्षा जास्त लोकांनी या पोस्टला लाईक केली आहे, तसेच चाहते मोहितचे अभिनंदन देखील करत आहेत. मोहितने पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘जगात तुझे स्वागत आहे. आमच्या बाहूंमध्ये प्रेम आणि आमच्या मनात आनंद भरला आहे. आम्ही अभिमानाने आमच्या मुलाच्या आगमनाची घोषणा करत आहोत. अभिमान वाटणारे आई-वडील. श्वेता आणि मोहित शर्मा.’ चाहते मोहितच्या या पोस्टवर लाइक्स करत आहेत आणि कमेंट्सच्या माध्यमातून त्याचे अभिनंदन देखील करत आहेत.
मोहित शर्मा सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. पण त्याची आतापर्यंतची कारकीर्द चांगली राहिली आहे. आतापर्यंत त्याने २६ एकदिवसीय आणि ८ टी२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यादरम्यान त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये ३१ विकेट्स घेतल्या आहेत. तर टी२० आंतरराष्ट्रीयमध्ये ६ विकेट्स घेतल्या आहेत. मोहितने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१५ मध्ये खेळला होता.
आयपीएलमधील त्याचे प्रदर्शन अधिक चांगले दिसते. आयपीएलमध्ये त्याने ८६ सामने खेळले आहेत आणि यामध्ये १९.०७ च्या स्ट्राइक रेटने ९२ विकेट्स घेतल्या आहेत. मोहितने त्याचा आयपीएलमधील शेवटचा सामना २० सप्टेंबर २०२० मध्ये खेळला होता. या सामन्यात तो पंजाब किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करत होता आणि समोर दिल्ली कॅपिटल्स संघ होता. या सामन्यात मोहित संघासाठी महागात पडला होता. त्याने टाकलेल्या चार षटकात तब्बल ४५ धावा दिल्या होत्या आणि एक विकेट घेतली होती.
महत्वाच्या बातम्या –
तब्बल १४४ वर्षांच्या इतिहासात केवळ भज्जीनेच केलाय हा विक्रम; १० वर्षात कोणी पोहचले नाही आसपास
इंग्लंडच्या ३९ वर्षीय खेळाडूची कमाल ! सूपरमॅन स्टाईलमध्ये केला झेलाचा ‘अविश्वसनीय’ प्रयत्न
दीपक हूडाच्या ‘मॅचविनिंग’ रेडने जयपूरचा यूपीवर रोमांचक विजय
व्हिडिओ पाहा –