भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा यावर्षी आयपीएलमध्ये जबरदस्त पुनरागमन करू शकला. मागच्या वर्षी मोहितने पूर्णपणे नव्याने सुरुवात केली होती. गुजरात टायटन्स संघासाठी त्याने आयपीएल 2022मध्ये नेट गोलंदाजाची भूमिका पार पाडली. पण यावर्षी संघाच्या प्रमुख गोलंदाजाची भूमिका तो पार पाडत आहे. मोहितला क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्यासाठी त्याचे प्रशिक्षक आणि सहकारी खेळाडूंचेही समर्थन मिळाले.
मोहित शर्मा (Mohit Sharma) काही वर्षांपूर्वी भारतीय संघाचा महत्वाचा वेगवान गोलंदाज होता. पण दुखापतीच्या कारणास्तव दरम्यानच्या काळी वर्षांमध्ये संघातून बाहेर होता. सोबतच आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जनेही त्याला रिलीज केले. अनेकांच्या वाटत होते की मोहित शर्मा या दुखापतीनंतर मैदानात पुनरागमन करू शकणार नाही. पण मोहितने मात्र या सर्व गोष्टी चुकीच्या ठरवल्या आणि यावर्षी आयपीएलमध्ये जबरदस्त पुनरागमन केले. यावर्षी त्याने 12 सामन्यांमध्ये 8.11च्या इकॉनॉमीने धावा खर्च केल्या आणि 19 विकेट्स घेतल्या. मोहितचा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे, ज्यामध्ये तो आपल्या कारकिर्दीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तिंविषयी बोलत आहे.
मोहीत शर्मा, मोहम्मद शमी आणि राशिद खान गुजरात टायटन्सने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मोहित शर्मा म्हणाला, “प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात त्याच्या प्रशिक्षकाची भूमिका महत्वाची असते. पण माझ्या हिशोबाने तुम्हा तुमच्या प्रशिक्षकांशी सर्व गोष्टी बोलू शकत नाही. त्यामुळे संघातील सहकारी खेळाडूंची भूमिकाही महत्वाची असते. आयुष्यात आणि क्रिकेटमध्ये मैदानात अशा बऱ्याच गोष्टी असतात, ज्या तुम्ही प्रशिक्षकांशी बोलू शकत नाही. अशा वेळी तुमच्यासोबत मित्र असणे गरजेचे असते.”
दरम्यान, लीग स्टेज संपल्यानंतर गुजरात टायटन्स गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर होती. अशात क्वॉलिफायर एकमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज अशी लढत झाली. या सामन्यात हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सला धोनीच्या सीएसकेकडून पराभव स्वीकारावा लागला. सीएसके या विजयानंतर अंतिम सामन्यात पोहोचली, तर गुजरात टायटन्सला अंतिम सामन्यासाठी क्वॉलिफायर दोन जिंकावी लागले. मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा क्वॉलिफायर दोनचा सामना शुक्रवारी (26 मे) रंगणार आहे. (Mohit Sharma got the support of these people during the time of trouble)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ईसीबीच्या करारातून मुक्त होणार इंग्लंडचा दिग्गज फलंदाज? लीग क्रिकेट खेळण्यासाठी 30 कोटींची ऑफर
रवी शास्त्रींनी डब्ल्यूटीसी फायनलसाठी निवडली भारताची प्लेइंग इलेव्हन, आरसीबीच्या दोघांना संधी