भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार ज्याने तीन आयसीसी (ICC) ट्रॉफी जिंकल्या आणि आयपीएलमध्येही चेन्नई सुपर किंग्जला (CSK) 5 वेळा विजेतेपद मिळवून दिले. हा दिग्गज क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या शांतपणामुळे ‘कॅप्टन कूल’ नावाने ओळखला जाते. पण असे अनेक प्रसंग घडले आहेत जेव्हा धोनी मैदानावर आपला संयम गमावताना किंवा रागावलेला दिसला. अशीच एक घटना समोर आली. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) आयपीएल खेळणाऱ्या मोहित शर्माने (Mohit Sharma) शेअर केली आहे.
वेगवान गोलंदाज मोहित शर्मा (Mohit Sharma) एका पॉडकास्टशी बोलताना म्हणाला, “आम्ही त्याच्याकडून (धोनी) खूप ऐकले आहे, पण तो नेहमी म्हणतो की मैदानावर जे घडते ते तिथेच राहते. तो तुम्हाला नंतर समजावून सांगेल, पण कधीही रागावणार नाही. वेगवान गोलंदाज असल्याने तुमचे लक्ष कमी होते. तुमच्या मागे काय चालले आहे याकडे लक्ष द्या. जर तो तुमच्याकडे बघत असेल आणि तुम्ही दुसरीकडे पहात असाल तर त्यामुळे बोलणी खावी लागतात.”
आयपीएल 2019 मधली एक घटना आठवताना मोहित म्हणाला, “दीपक चहरबद्दलही खूप ऐकले आहे. त्याचीही एक कथा आहे. 2019 मध्ये, दीपक एक सामना खेळत होता आणि मी नव्हतो. सामना चेन्नईत होता आणि सगळ्यांनाच घाम फुटला होता. त्याने एक नकल बॉल टाकला जो माझ्या मते पूर्ण फुलटॉस किंवा काहीतरी होता, जो चौकार किंवा षटकार मारला गेला होता. धोनीभाईने पुन्हा असा चेंडू टाकू नये असे सांगितले. ‘ठीक आहे माही भाई’ म्हणत पुढचे 2-3 चेंडू टाकल्यावर त्याने पुन्हा नकल बॉल टाकला, जो यावेळी फलंदाजाच्या डोक्यावरून गेला.”
पुढे बोलताना मोहित म्हणाला, “माही भाई त्याच्याकडे आला, दीपकच्या खांद्यावर हात ठेवला, त्याच्याशी काही गोष्टी बोलला आणि परत गेला. साहजिकच, आम्हाला काय चालले आहे हे माहित नव्हते. मग सामना संपल्यावर आम्ही विचारले काय झाले? तो म्हणाला, तो काय म्हणाला माहीत आहे? त्याने काहीतरी सांगितले आणि मग तो म्हणाला, ‘तू मूर्ख नाहीस, मी मूर्ख आहे.’ तर ही एक गोष्ट आहे जी आपल्या नेहमी लक्षात राहते. पण धोनी मात्र चहरवर तितकेच प्रेम करतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025: ‘हा’ स्टार खेळाडू सोडणार मुंबई इंडियन्सची साथ?
कानपूरच्या स्टेडियममध्ये प्रथम गोलंदाजी करण्यास घाबरतात संघ? आकडेवारी धक्कादायक!
आश्चर्यकारक! 18 वर्षीय खेळाडूने रचला इतिहास, 498 धावांची तुफानी खेळी