क्रिकेटविश्वातील सर्वात कट्टर प्रतिद्वंद्वी भारत आणि पाकिस्तान रविवारी (04 सप्टेंबर) दुबईच्या मैदानावर आमनेसामने आले होते. आशिया चषकाच्या सुपर फोर फेरीतील या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 7 विकेट्सच्या नुकसानावर 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 19.5 षटकात 5 विकेट्स राखून भारताचे आव्हान पूर्ण केले आणि सामना जिंकला. पाकिस्तानच्या विजयात सिंहाचा वाटा उचललेल्या सलामीवीर मोहम्मद रिझवान याला सामनावीर पुरस्कार मिळेल असे मानले जात होते. मात्र, सामनावीर पुरस्कार मोहम्मद नवाज याला मिळाला. रिझवानपेक्षा कमी धावा केल्यानंतरही त्याला हा पुरस्कारा का दिला गेला? असे अनेक जण विचारत आहेत.
भारताने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला कर्णधार बाबर आज आमच्या रूपाने पहिला धक्का बसला. मात्र, त्यानंतर मोहम्मद रिझवानने एक बाजू लावून धरत 51 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 71 धावांची तुफानी खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानला यावेळी भारतावर विजय मिळवता आला. मात्र, त्यानंतरही रिझवानला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला नाही.
त्याचवेळी रिझवानच्या जागी 42 धावा करणाऱ्या मोहम्मद नवाज याच्या गळ्यात सलामीवीराचे पदक गेले. संघ अडचणीत असताना पाकिस्तानी कर्णधाराने नवाजला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. नेहमी सातव्या आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येणारा नवाज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यानंतर त्याने केवळ 20 चेंडूवर 42 धावा चोपल्या. यात सहा चौकार व दोन षटकारांचा समावेश होता. याव्यतिरिक्त त्याने गोलंदाजी करताना आपल्या चार षटकात केवळ 25 धावा देत भारताचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव याचा बळी मिळवला. याच अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नेहमी भारतीय संघावर निशाणा साधणारा पाकिस्तानी क्रिकेटर उतरला अर्शदीपच्या समर्थनार्थ, म्हणतोय..
‘या’ सुंदर चाहतीने मैदानात येऊन वाढवली अनुष्काची चिंता? म्हणतीये, ‘फक्त विराटसाठी…’
ज्याने हरवले, तोच मदतीला धावणार; भारताला फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी पाकिस्तानची होणार हेल्प!!






