तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये रविवारी (22 जुलै) डिंडिगुल ड्रॅगन्स विरुद्ध व्हीबी कांची वीरन्स यांच्यात स्पर्धेतील 12 वा सामना झाला.
या सामन्यात व्हीबी कांची वीरन्सचा अष्टपैलू खेळाडू मोकित हरीहरनने 77 धावांची खेळी केली.मात्र या सामन्यात मोकितने त्याच्या फलंदाजीपेक्षा त्याच्या गोलंदाजीने संपूर्ण भारताला आश्चर्यचकित केले.
Yes. Believe what you are seeing. @sprite_india refreshing moment of the day. #TNPL2018 #NammaOoruNammaGethu pic.twitter.com/4RrgSBsMXW
— TNPL (@TNPremierLeague) July 22, 2018
मोकितने व्हीबी कांची वीरन्ससाठी दोन्ही हातानी गोलंदाजी केली. त्याच्या या कृतीने विरोधी संघातील खेळाडूंसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
ज्यावेळी उजव्या हातचा फलंदाज स्ट्राइकवर असायचा त्यावेळी मोकित डाव्या हाताने गोलंदाजी करायचा. तर डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राइकवर असायचा त्यावेळी मोकित उजव्या हाताने गोलंदाजी करायचा.
या सामन्यात मोकितने 4 षटके टाकली यामध्ये त्याने 32 धावा दिल्या. त्याला या सामन्यात एकही बळी मिळवता आला नाही.
या सामन्यात व्हीबी कांची वीरन्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 4 बाद 166 धावा केल्या होत्या. डिंडिगुल ड्रॅगन्स 19.3 षटकात 3 बाद 171 धावा करत सामना जिंकला.
Akshay Karnewar bowling slow left-arm to right handers and right-arm off-spin to the lefties. @Sportskeeda #BPXIvAUS #AUSvBPXI pic.twitter.com/CUVC5HUK6A
— Viggy (@VigneshA_26) September 12, 2017
यापूर्वी विदर्भाचा गोलंदाज अक्षय कर्नेवर ने 2017 ला भारताच्या अध्यक्षीय संघाकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना दोन्ही हातांनी गोलंदाजी केली होती.
महत्वाच्या बातम्या-
-संघाला केले 18 धावांवर आॅलआऊट, 12 मिनीटांतच केला धावांचा पाठलाग
-संजय मांजरेकर, हर्षा भोगलेंना टक्कर द्यायला नवीन समालोचक…–