जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमध्ये खेळण्याचे प्रत्येक युवा क्रिकेटपटूचे स्वप्न असते. आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असते. आयपीएलमधील कामगिरीच्या बळावर अनेक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाल्याचे आपण पाहिले आहे. पृथ्वी शॉ, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी सारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यामागे आयपीएलचा मोठा वाटा असल्याची कबुली दिली आहे.
वर्तमान काळातही अनेक युवा खेळाडू आयपीएलमध्ये निवड होवून आपली कारकीर्द यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्वांमध्येच एक नाव आहे दिल्लीचा उगवता युवा खेळाडू मोक्ष मुरगई याचे.
२१ वर्षीय मोक्ष मुरगई हा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा फार मोठा चाहता आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळण्याचे त्याचे स्वप्न असून त्यासाठी सध्या तो कठोर मेहनत घेत आहे. धोनीला आदर्श मानून वयाच्या सातव्या वर्षापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केलेल्या मोक्षने कोरोनाच्या या कठीण काळात देखील हार न मानता घराच्या छतावर सराव सुरू ठेवला आहे. दिल्लीतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे तेथील मैदाने सरावासाठी बंद करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत देखील मोक्षने आपली मेहनत सुरूच ठेवली आहे.
मोक्ष सध्या नोएडा येथील आशिष नेहरा राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. मोक्षने राष्ट्रीय पातळीवर अंडर 14, अंडर 16 व अंडर 19 मध्ये दिल्लीचे प्रतिनिधीत्व केले आहे. कोरोनाच्या कठीण काळातदेखील मोक्ष घेत असलेला या मेहनतीबद्दल त्याने सर्वांचीच वाहवा मिळवली आहे. मोक्षचा हा सकारात्मक दृष्टिकोन युवा खेळाडूंसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे. मोक्षला आशा आहे की तो आपल्या मेहनतीच्या बळावर यशाचे शिखर नक्कीच पार करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
भावा आजूबाजूला पाहायचं ना! रिषभ पंतचा ‘पॅन्टलेस अवतार’ कॅमेरात कैद, नेटकऱ्यांनी घेतली मजा
Covid-19: राजस्थान रॉयल्सनंतर आता ‘या’ आयपीएल संघाने दिला मदतीचा हात, केली १.५ कोटींची मदत