टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. कमालीच्या एकतर्फी झालेल्या सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानकडून १० गड्यांनी पराभूत व्हावे लागले. या विजयानंतर सर्व पाकिस्तानमध्ये तसेच पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाकिस्तानच्या एका चिरपरिचित चाहत्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
तो चाहता पुन्हा आला
पाकिस्तान क्रिकेटचा प्रसिद्ध चाहता असलेला मोमिन साकिब हा टी२० विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान पाहण्यासाठी दुबई येथे आला होता. मूळचा पाकिस्तानी असलेला साकिब इंग्लंडचा रहिवासी आहे. २०१९ वनडे विश्वचषकात पाकिस्तान पराभूत झाल्यानंतर त्याचा एक गमतीदार व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये तो आपल्या खास अंदाजात पाकिस्तानी खेळाडूंवर टीका करताना तसेच भारतीय संघाचे कौतुक करताना दिसलेला. या व्हिडिओला आजही चाहत्यांची तूफान पसंती लाभते.
नव्या व्हिडिओत आला या रूपात
पाकिस्तानने भारतावर विजय मिळवल्यानंतर साकिब याचा एक व्हिडीओ समोर आला. आयसीसीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये साकिब अत्यंत खुश दिसतोय. त्याने आपल्या खास शैलीत पाकिस्तानी संघाचे कौतुक केले. या व्हिडिओमध्ये त्याचा तो मजेशीर अंदाज पुन्हा एकदा दिसत आहे.
Look who we spotted 🇵🇰 fans 👀#INDvPAK | #T20WorldCup pic.twitter.com/9ePNgJsNNz
— ICC (@ICC) October 25, 2021
पाकिस्तानचा भारतावर दणदणीत विजय
तब्बल २९ वर्ष आणि विश्वचषकातील १२ सामन्यांनंतर पाकिस्तानने भारतीय संघाला विश्वचषकातील सामन्यात पराभूत केले. भारताने दिलेल्या १५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांनी नाबाद खेळ्या करत संघाला १० गड्यांनी अविस्मरणीय विजय मिळवून दिला. यासह पाकिस्तानने आपल्या विश्वचषकात मोहिमेची सुरवात विजयाने केली. दुसरीकडे भारतीय संघाला या पराभवामुळे आपल्या गोलंदाजीवर तसेच फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-