---Advertisement---

IPL चॅम्पियन संघाला मिळणार कोट्यावधी, उपविजेत्याचे गणित काय?

On: शनिवार, मार्च 22, 2025 7:01 PM
---Advertisement---

आज पासून आयपीएल स्पर्धेच्या 18 व्या हंगामाला सुरुवात होत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघामध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर आज दोन्ही संघांमध्ये सामना खेळला जाणार आहे. तसेच हंगामातील अंतिम सामना 25 मे रोजी खेळला जाणार आहे. आयपीएल स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षीप्रमाणे खेळाडूंवर पैशांचा पाऊस होणार आहे. प्रत्येक सामान्यानंतर खेळाडूंना चांगल्या प्रदर्शनासाठी बक्षिसे दिले जातील.

रिपोर्टच्या म्हणण्यानुसार या हंगामातही पैशांचे बक्षीस मागच्या स्पर्धेइतकेच असेल. यावर्षी सुद्धा आयपीएल चॅम्पियन होणाऱ्या संघाला 20 करोड रुपये देण्यात येतील. तसेच अंतिम सामनामध्ये पराभूत होणाऱ्या संघाला सुद्धा 12.3 करोड रुपये देण्यात येतील. तसेच तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या संघाला 7 करोड तर चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या संघाला 6.5 करोड रुपये मिळणार आहेत. तसेच पाचव्या क्रमांकापासून ते दहाव्या क्रमांकाच्या संघांना कोणतेही पैशांचे बक्षीस दिले जाणार नाही. याशिवाय स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अंतिम सामन्यानंतर बक्षीस देण्यात येतील.

आयपीएल 2025 स्पर्धेचे बक्षीस विजेता संघ- 20 करोड रुपये

उप-विजेता संघ- 12.5 करोड रुपये

तिसरा नंबर संघ- 7 करोड रुपये

चौथा नंबर संघ -6.5 करोड रुपये

स्पर्धेत सर्वात जास्त विकेट (पर्पल कॅप) 10 लाख रुपये

स्पर्धेत सर्वात जास्त धावा (ऑरेंज कॅप)10 लाख रुपये

स्पर्धेत सर्वात जास्त षटकार – 10 लाख रुपये

स्पर्धेत सर्वात जास्त चौकार – 10 लाख रुपये

स्पर्धेत सर्वात जास्त कॅच-10 लाख रुपये

आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही बदल केले आहेत. यामध्ये सर्वात मोठा बदल हा आहे की, चेंडूवर लाळ वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या काळामध्ये यावर बंदी घालण्यात आली होती, पण आता यामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानंतर आज पहिल्यांदा गोलंदाज हे करतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---