---Advertisement---

IND vs ENG: शार्दुलऐवजी ‘या’ खेळाडूला भारतीय संघात संधी द्या! माजी क्रिकेटरचा मोठा सल्ला

---Advertisement---

India vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघाने भारताचा 5 विकेट्सने पराभव केला. दरम्यान या कसोटीत भारताच्या गोलंदाजीच्या कमतरता उघड झाल्या. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या 10 विकेट्स घेण्यात संघाला यश आले नाही. याचा परिणाम असा झाला की, यजमान संघाने 371 धावांचे मोठे लक्ष्यही 5 विकेट्स राखून मिळवले.

यामुळे आता मालिकेत दुसऱ्या सामन्यासाठी भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या प्रकारचे बदल करावेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच वेळी इंग्लंडचे माजी फिरकीपटू मोंटी पनेसर यांनी भारताला आपल्या संघात आणखी एका फिरकी गोलंदाजाचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे.

पनेसर यांचे मत आहे की, बर्मिंगहॅममध्ये होणाऱ्या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या जागी डावखुरा मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संधी द्यावी. पनेसर यांना वाटते की, बर्मिंगहॅममध्ये हा फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. भारतीय गोलंदाज लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 371 धावांचे लक्ष्य वाचवू शकले नाहीत, ज्यानंतर पाहुण्या संघाच्या आक्रमकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पनेसर म्हणाले, “एजबेस्टनमध्ये भारत रवींद्र जडेजाला फायनल प्लेइंग 11 मध्ये कायम ठेवू शकतो आणि कुलदीप यादवला ‘एक्स फॅक्टर’ म्हणून संघात समाविष्ट करू शकतो. एजबेस्टनची खेळपट्टी थोडी टर्न घेते. त्यामुळे तुमच्याकडे तो ‘एक्स फॅक्टर’ आहे, जो मला वाटते की एक चांगला पर्याय ठरेल. त्याच्यात काहीतरी खास आहे.” (Kuldeep Yadav X-Factor)

पुढे बोलताना ते म्हणाले, “कुलदीपला टर्निंग ट्रॅकची गरज नाही. आम्ही आयपीएल दरम्यान पाहिले आहे की, त्याला विकेटमधून फारसा टर्न मिळत नसतानाही तो फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. जर शार्दुल ठाकूर फक्त 6 ते 8 षटकेच गोलंदाजी करणार असेल आणि दिवसभरात 15 षटकेही टाकू शकणार नसेल, तर त्याला संघात ठेवण्याचा काहीच अर्थ नाही.” (Shardul Thakur Replacement)

जेव्हा पनेसरला विचारण्यात आले की, भारताने जडेजाऐवजी कुलदीपची निवड करावी का, तेव्हा त्यांनी कोणताही संकोच दाखवला नाही. ते म्हणाले, “मला वाटते की, त्यांना कुलदीपला संघात ठेवण्याची गरज आहे कारण त्याच्यात ‘एक्स फॅक्टर’ जास्त आहे. त्याच्यात काहीतरी खास आहे. जर तुम्हाला संघात एकच फिरकीपटू ठेवायचा असेल, तर जडेजाऐवजी कुलदीपला फायनल प्लेइंग 11 ठेवले पाहिजे.” (Monty Panesar Kuldeep Yadav)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---