आज (8 मार्च) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील अंतिम सामना पार पडला. या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारतीय महिला संघाचा 85 धावांनी पराभव करत विश्वविजेतेपद मिळवले. याचबरोबर, या सामन्यात एक अनोखा विक्रम झाला आहे.
तो असा की, ऑस्ट्रेलियात महिलांच्या क्रिकेट सामन्यात सर्वाधिक प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित होते. आज मेलबर्नच्या स्टेडियमवर 86,174 प्रेक्षक उपस्थित होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियात महिलांच्या कोणत्याही क्रिडाप्रकारात आत्तापर्यंत सगळ्यात जास्त स्टेडियममधील प्रेक्षकसंख्येचा विश्वविक्रम या सामन्यात नोंदवला गेला आहे.
विशेष म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुरवलेल्या आकडेवारीनुसार, एक महिन्यापूर्वी ऑस्ट्रेलियात महिलांच्या क्रिकेट सामन्यात प्रेक्षकांच्या उपस्थितीचा सर्वाधिक आकडा 5650 इतका होता. तर, आजच्या सामन्यात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourne Cricket Ground) या संख्येच्या तब्बल 1425 टक्क्यांची वाढ झाली आहे.