दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज माॅर्नै माॅर्कैलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषीत केली आहे. कौटंबिक कारणास्तव आपण निवृत्ती घेत असल्याचे त्याने सांगितले आहे.
तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमधुन निवृत्त होत असून आॅस्ट्रेलिया विरुद्ध होणारी कसोटी मालिका त्याची शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका ठरणार आहे.
या ३३ वर्षीय खेळाडूने आफ्रिकेकडून ८३ कसोटी, ११७ वनडे आणि ४४ टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत २९४ विकेट्स घेतल्या असून तो कसोटील आफ्रिकेकडून सर्वाधिक विकेट घेणारा ५वा गोलंदाज आहे.
तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये माॅर्कैलने 529 विकेट्स घेतल्या आहेत.
आॅस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका १ मार्च पासून सूरु होत आहे.
#CSAnews @mornemorkel65 to retire from international cricket after Australia series https://t.co/frtYF3kJhn pic.twitter.com/IVmUSbfD1I
— Proteas Men (@ProteasMenCSA) February 26, 2018