---Advertisement---

वा रे वा….! असे ३ कर्णधार ज्यांनी आयसीसी स्पर्धांमध्ये केली सर्वाधिक शतकं, ‘हा’ भारतीय अव्वल स्थानी

On: रविवार, डिसेंबर 27, 2020 9:10 AM
---Advertisement---

प्रत्येक क्रिकेट खेळाडूची विशेषता त्याने दबावात केलेल्या कामगिरी मुळे ओळखली जाते . क्रिकेटमध्ये सर्वाधिक दबाव आयसीसी क्रिकेट स्पर्धांमध्ये असतो. कारण आयसीसीची स्पर्धा म्हटलं की 8-10 देश एक विजेतेपद मिळण्यासाठी प्रयत्न करत असतात. आयसीसी स्पर्धांमध्ये वन डे विश्वचषक, टी-20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी व टेस्ट चॅम्पियनशिप या स्पर्धांचा समावेश होतो. साधारण सामन्य क्रिकेट सामन्यातही शतक करणे ही मोठी कामगिरी मानली जाते, पुढे काही काळासाठी एखाद्या खेळाडूने केलेल्या शतकांचे कौतुकही बरेच होत असते. त्यातही जर एखाद्या खेळाडूने त्याचे शतक आयसीसीच्या स्पर्धेत केले असेल तर ते दीर्घकाळासाठी लक्षात राहते. आपण या लेखात देखील टॉप 3 कर्णधारांबद्दल जाणून घेणार आहोत,  ज्यांनी आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिक शतके केलेली आहेत.

३) रिकी पॉंटिंग – (5)

क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक समजल्या जाणाऱ्या माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉंटिंग यांनी आयसीसी स्पर्धांमध्ये 5 शतके केलेली आहेत. तीन वेळा वनडे विश्वचषक विजेत्या या खेळाडूने आपल्या नेतृत्वात 2003 व 2007 सालचा वनडे विश्वचषक जिंकलेला होता. रिकी पॉंटिंग यांची 2003 विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारताविरुद्ध खेळलेली 140 धावांची खेळी, विश्वचषक इतिहासातील सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. तो आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या कर्णधारांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

२) केन विलियम्सन- (5)

वर्तमान क्रिकेटमधील मॉडन मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केन विलियम्सननेही आयसीसी स्पर्धांमध्ये ५ शतके केलेली आहेत. मात्र ही कामगिरी त्याने रिकी पॉंटिंग यांच्यापेक्षा कमी सामन्यांमध्ये केली असल्याने तो या यादीत द्वितीय क्रमांकावर येतो. पाकिस्तान विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शतक ठोकत विलियम्सन आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या कर्णधारांमध्ये आघाडीवर पोहोचला आहे.

१) सौरव गांगुली – (6)

भारताचे माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुली, हे आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत ६ शतकांतसह क्रमांक १ वर आहेत. गांगुली यांनी वनडे विश्वचषक व चॅम्पियन्स ट्रॉफी या दोन स्पर्धांत मिळून 6 शतके केलेली आहेत. विशेष बाब म्हणजे गांगुली यांनी टी-20 विश्वचषक व कसोटी चॅम्पियनशीप खेळलेली नाही. गांगुली यांच्या या कामगिरीमुळेच क्रिकेट विश्वात त्यांची ओळख’ दादा ‘ या नावाने आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“गिलने दोन वर्षांपुर्वीच कसोटीत पदार्पण करायला हवे होते”, पाहा कुणी केलंय हे वक्तव्य

कर्णधार असावा असा! ‘या’ दिग्गजांनी केले अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचे कौतुक

टीम पेनने डाइव्ह मारत एका हाताने पकडला पुजाराचा सुरेख झेल, व्हिडिओ होतोय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---