---Advertisement---

कॅप्टन म्हणूनही ‘किंग’! टी२० क्रिकेटमध्ये ‘या’ बाबतीत विराट जगातील भल्याभल्या कर्णधारांना पडलाय भारी

On: गुरूवार, सप्टेंबर 16, 2021 10:08 PM
---Advertisement---

नुकतेच विराट कोहलीने घोषणा केली की टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेनंतर तो आपल्या टी२० कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. याआधी याबाबतच्या बातम्या येत होत्या, पण आता विराटनेच यावर शिकामोर्तब करून हा विषय थांबवला आहे. विराटच्या या निर्णयाने त्याच्या टी२० कर्णधारपदाच्या कारकिर्दीच्या यश-अपयश बद्दल चर्चा सुरू झाली आहे. पण आकडे विराटच्या बाजूने कौल देत असून त्याच्या यशाची पावती देत आहेत.

विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा २०० धावांचा पल्ला गाठला आहे. टी२० क्रिकेटमध्ये २०० धावा करणे म्हणजे महाकठीण काम समजले जाते. कारण, त्यासाठी त्या तोडीची फलंदाजी संघाकडे असायला हवी. पण, हे महाकठीण भारतीय संघाने विराटच्या नेतृत्वाखाली ११ वेळा केले आहे.

या यादीत विराटच्या आसपास एकही कर्णधार नाही. दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा केन विलियम्सन आहे. त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने सहा वेळेस ही कामगिरी केली आहे. तर तिसऱ्या स्थानी भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाचवेळा ही कामगिरी केली होती.

धोनी सोबतच या यादीत संयुक्तपणे स्थान मिळवले आहे ते, दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस, इंग्लडचा ओएन मॉर्गन आणि अफगाणिस्तानचा असगर अफगाण या कर्णधारांनी. त्यांच्याही नेतृत्वाखाली त्याच्या देशाच्या संघाने प्रत्येकी ५ वेळा २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे.

टी२० विश्वचषक २०२१ साठी सर्व देशांनी आपआपल्या संघाची घोषणा केली आहे. भारतानेही विराटच्या नेतृत्वाखालील संघाची घोषणा केली आहे. युझवेंद्र चहल आणि शिखर धवन यांची संघात निवड न झाल्याने बरीच चर्चा झाली होती. याशिवाय सुर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी संघात जागा मिळवण्यास यशस्वी ठरले आहेत. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यानंतर विश्वचषकाचे बिगुल वाजणार आहे.

तत्पूर्वी, विराटने त्याला आजपर्यंत टी२० मिळालेल्या संधीमुळे बीसीसीआयचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. संधी मिळेल तोपर्यंत प्रामाणिकपणे काम करत राहणार असल्याचेही त्याने म्हटले आहे. तसेच तो टी२० विश्वचषकानंतर टी२० भारतीय संघात केवळ फलंदाज म्हणून खेळणे कायम ठेवेल. त्याचबरोबर वनडे आणि कसोटीचा कर्णधार म्हणूनही तो कायम असेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

धोनी नव्हे विराटच भारताचा सर्वोत्तम टी२० कर्णधार! पाहा आकडेवारी

एकच वादा रिषभ दादा! उर्वरित आयपीएलसाठी दिल्लीच्या कर्णधारपदी पंतच राहणार, वाचा सविस्तर

‘तर धोनी महान क्षेत्ररक्षकही झाला असता’, कैफने शेअर केलेला जुना व्हिडीओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---