सलामीवीर ईशान किशन, कर्णधार रोहित शर्मा आणि दुखापतीतून पुनरागमन करणारा श्रेयस अय्यर अलीकडे जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. मात्र, विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारताच्या पहिल्याच सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपुढे गुडघे टेकले. मात्र, तरीही भारताने सहजरीत्या 6 विकेट्सने सामना खिशात घातला. हे शक्य झाले विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या अर्धशतकी योगदानामुळे. विराटचे शतक यावेळी 15 धावांनी हुकले. मात्र, त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे त्याच्या नावावर वनडेतील खास विक्रम नोंदवला गेला. चला तर, त्याचा विक्रम जाणून घेऊयात…
वनडेत विराटचा ‘असा’ही विक्रम
बलाढ्य ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी 199 धावा करत भारतापुढे 200 धावांचे क्षुल्लक आव्हान ठेवले होते. मात्र, तरीही भारतीय संघ सुरुवातीपासूनच संघर्ष करताना दिसला. भारताची धावसंख्या 3 बाद 2 अशी होती. तिथून पुढे विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी 215 चेंडूत 165 धावांची दीडशतकी भागीदारी करत संघाचा विजय सोपा केला. विराटने सामन्यादरम्यान 116 चेंडूंचा सामना करताना 85 धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 6 चौकारांचा समावेश होता. विराटने सामन्यात अर्धशतक ठोकताच मोठा कारनामा केला.
वनडे क्रिकेटमध्ये आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्यासोबत संयुक्तरीत्या अव्वलस्थानी विराजमान झाला. विराट आणि सचिनने आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना 45 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावांचा पाऊस पाडला आहे.
विराट आणि सचिननंतर या यादीत दुसऱ्या स्थानी संयुक्तरीत्या तीन खेळाडू आहेत. त्यात भारताचा रोहित शर्मा, दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस आणि 5 वेळचा विश्वविजेता संघ ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आहे. या तिन्ही खेळाडूंनी वनडेत आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना 37 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावसंख्या उभारली आहे. (Most 50+ Scores in Successful Chasing in ODIs virat kohli on top along with sachin tendulkar)
वनडेत आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारे फलंदाज
45 – विराट कोहली*
45 – सचिन तेंडुलकर
37 – रोहित शर्मा
37 – जॅक कॅलिस
37 – रिकी पाँटिंग
हेही वाचा-
विराटने संपवली सचिनची बादशाहत! ‘या’ विक्रमात ‘मास्टर ब्लास्टर’ला पछाडत बनला जगातला टॉपर फलंदाज
‘विराटचा कॅच सुटल्यानंतर मी…’, भारताच्या विजयानंतर अश्विनचे खळबळजनक विधान; वाचून तुमच्याही भुवया उंचावतील