---Advertisement---

या यादीत ‘हिटमॅन’ रोहित शर्मा देतोय ‘रनमशीन’ विराट कोहलीला बरोबरीची टक्कर

On: बुधवार, जानेवारी 29, 2020 6:24 PM
---Advertisement---

हॅमिल्टन। आज(29 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा टी20 सामना सेडन पार्क येथे पार पडला. भारताने या सामन्यात सुुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने मोलाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली तर सुपर ओव्हरमध्ये 15 धावांची खेळी केली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून रोहितने 40 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 65 धावांची खेळी केली. रोहितची ही आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची 24 वी वेळ आहे. यामध्ये त्याच्या 4 शतकांचा आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे.

त्यामुळे आता त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिकवेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीची बरोबरी केली आहे. विराटनेही आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 24 वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली. यामध्ये विराटच्या 24 अर्धशतकांचा समावेश आहे.

त्यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिकवेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत विराट आणि रोहित संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आले आहेत.

आजच्या सामन्यात भारताकडून रोहित बरोबरच विराटने 27 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 38 धावांची छोटेखानी खेळी केली. त्यांच्या खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 बाद 179 धावा केल्या होत्या. पण नंतर न्यूझीलंडलाही निर्धारित 20 षटकात 6 बाद 179 धावाच करता आल्या. त्यामुळे या सामन्यात सुपर ओव्हर झाली.

सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 17 धावा करत भारताला 18 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुलने मिळून 20 धावा करत भारताला विजय मिळवून दिला. सुपर ओव्हरमध्ये रोहितने 15 आणि राहुलने 5 धावा केल्या.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारे खेळाडू-

24- रोहित शर्मा, सामने- 107

24- विराट कोहली, सामने- 81

17- मार्टिन गप्टील, सामने- 86

17 – पॉल स्टर्लिंग, सामने – 75

16 – डेव्हिड वॉर्नर, सामने – 76

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---