आयपीएल २०२० ने अंतिम टप्पा गाठला आहे. मंगळवारी (३ नोव्हेंबर) साखळी सामन्यातील शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. या सामन्यात मुंबईचा युवा प्रतिभावान फलंदाज इशान किशनने एक खास कारनामा केला. त्याने यामध्ये ख्रिस गेल आणि कायरन पोलार्डसारख्या विस्फोटक फलंदाजांनाही मागे टाकले आहे.
नाणेफेक जिंकत हैदराबादने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि मुंबईला फलंदाजासाठी आमंत्रित केले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ८ विकेट्स गमावत १४९ धावा केल्या. मुंबईकडून फलंदाजी करताना इशान किशनने चांगली फटकेबाजी करत ३० चेंडूत ३३ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. यात त्याने १ चौकार आणि २ षटकार ठोकले.
त्याने ठोकलेल्या या २ षटकारांचा त्याला खूप मोठा फायदा झाला. या षटकारांमुळे त्याने आयपीएल २०२०मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये स्थान मिळवले. किशनने एकूण २६ षटकार ठोकले आहेत. यासह त्याने राजस्थान रॉयल्सचा धडाकेबाज फलंदाज संजू सॅमसनची बरोबरी केली. सॅमसननेही २६ षटकार मारले आहेत.
या दोघांव्यतिरिक्त आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत निकोलस पूरन (२५), ऑयन मॉर्गन (२४) तसेच ख्रिस गेल, एबी डिविलियर्स, केएल राहुल यांनी प्रत्येकी २३ षटकार ठोकले आहेत. सोबतच कायरन पोलार्ड (२२), तर क्विंटन डी कॉक आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी २० षटकार ठोकले आहेत.
इशान किशनने आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत १२ सामन्यात ४२८ धावा केल्या आहेत. आयपीएलच्या या हंगामात ४०० धावांचा टप्पा पार करणारा अनकॅप (आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण न केलेला) खेळाडू ठरला.
आयपीएल २०२० मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज
२६* षटकार- इशान किशन
२६ षटकार- संजू सॅमसन
२५ षटकार- निकोलस पूरन
२४ षटकार- ऑयन मॉर्गन
२३ षटकार- ख्रिस गेल
२३ षटकार- एबी डिविलियर्स
२३ षटकार- केएल राहुल
२२ षटकार- कायरन पोलार्ड
२० षटकार- क्विंटन डी कॉक
२० षटकार- हार्दिक पंड्या
महत्त्वाच्या बातम्या-
-आई फक्त तुझ्याचमुळे! मुंबईच्या इशान किशनने फलंदाजीचे श्रेय दिले आईला
-अबब! आर्चरने इशान किशनचा घेतलेला झेल पाहून सगळ्यांच्याच बत्त्या झाल्या गुल
-जल्दी से भागो रे भैया! डी कॉकच्या जबरा सिक्सरचा चेंडू स्टेडियम बाहेर, चाहता बॉल घेऊन फरार
ट्रेंडिंग लेख-
-‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
-IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?





