वेलिंगटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज (3 फेब्रुवारी) पाचवा वनडे सामना सुरू आहे. यामध्ये भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 252 धावा केल्या आहेत.
या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पंड्याने धडाकेबाद फलंदाजी केली आहे. त्याने 2 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने 22 चेंडूत 45 धावा केल्या आहेत.
यावेळी हार्दिकने न्यूझीलंड विरुद्ध एका वन-डे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे.
या यादीत पहिल्या क्रमांकावर युसुफ पठाण असून त्याने 2010ला न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर आला असता 4थ्या सामन्यात 7 षटकार मारले होते.
याचबरोबर या यादीत युवराज सिंग, विरेंद्र सेहवाग प्रत्येकी 6 षटकारांसह संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर सचिन, सुरेश रैना आणि हार्दिक प्रत्येकी 5 षटकारांसह संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. युवराज, सचिन आणि सुरेश या तिघांनीही 2009च्या न्यूझीलंड दौऱ्यात तिसऱ्या सामन्यात ही कामगिरी केली होती.
आजच्या सामन्यात भारताच्या पहिल्या 4 विकेट्स लवकर पडल्या. यानंतर अंबाती रायडू आणि विजय शंकर या दोघांनी उत्तम फलंदाजी केली. त्यांनी अनुक्रमे 90 आणि 45 धावा केल्या आहेत. यांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरला.
केदार जाधवनेही 34 धावा जोडल्या आहेत. यामुळे भारताला 250 धावांचा टप्पा गाठता आला.
न्यूझीलंड विरुद्ध एका वन-डे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय खेळाडू-
7 – युसुफ पठाण (2010)
6 – युवराज सिंग (2009)
6 – विरेंद्र सेहवाग (2009)
5 – हार्दिक पंड्या (2019)*
5 – सचिन तेंडुलकर (2009)
5 – सुरेश रैना (2009)
महत्त्वाच्या बातम्या-
–९० धावा करुनही अंबाती रायडूच्या नावावर झाला नकोसा विक्रम
–या कारणामुळे भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेचे वेळापत्रक बदलणार
–सांगली एक्सप्रेस स्म्रीती मंधनाने जागतिक क्रमवारीतही घेतली मोठी झेप