कोलंबो। काल भारत विरुद्ध बांग्लादेश संघात झालेल्या सामन्यात भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्माने दमदार अर्धशतक केले. या अर्धशतकाच्या जोरावर भारताने या सामन्यात बांग्लादेशवर १७ धावांनी मात केली.
रोहितने काल ६१ चेंडूत ८९ धावा केल्या होत्या. याबरोबरच त्याने एक खास विक्रमही केला आहे. आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक वेळा ७५ धावांपेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित तिलत्करने दिलशानला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
रोहितने आजपर्यंत आंतराष्ट्रीय टी २० मध्ये ६ वेळा ७५ पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याचबरोबर मार्टिन गप्टिल, माहेला जयवर्धने आणि विराट कोहली यांनीही आंतराष्ट्रीय टी २० मध्ये ६ वेळा ७५ धावांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
या यादीत ख्रिस गेल अव्वल स्थानावर आहे. गेलने ८ वेळा आंतराष्ट्रीय टी २० मध्ये ७५ धावांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
आंतराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक वेळा ७५ धावांपेक्षा जास्त धावा करणारे फलंदाज:
ख्रिस गेल – ८
मार्टिन गप्टिल, माहेला जयवर्धने, विराट कोहली, रोहित शर्मा – ६
तिलत्करने दिलशान – ५