भारतीय संघ आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भिडणार आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवरील या सामन्यात नाणेफेक झाली असून श्रीलंकेने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तसेच, भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले आहे. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवला गेला आहे. असे असले, तरीही भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली आहे. तसेच, जडेजाने खास यादीत जागा मिळवली आहे.
रोहित शर्माचा विक्रम
‘हिटमॅन’ रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उतरून जबरदस्त विक्रम केला आहे. असा विक्रम सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांसारख्या खेळाडूंनाही जमला नाहीये. खरं तर, भारताकडून सर्वाधिक आशिया चषक अंतिम सामना खेळण्याचा विक्रम रोहितने केला आहे. रोहित सर्वाधिक 5 वेळा आशिया चषकाचा अंतिम सामना खेळणारा पहिलाच खेळाडू बनला आहे.
विशेष म्हणजे, रोहित शर्मा याने आशिया चषकाचा सर्वात सर्वात पहिला अंतिम सामना 2008मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याने 2010च्या आशिया चषकाचा अंतिम सामना खेळला. तसेच, 2016, 2018 आणि आता 2023 आशिया चषकाचा अंतिम सामना खेळण्याचा बहुमानही रोहितला मिळाला आहे.
रोहित शर्मा भाग असलेला आशिया चषक स्पर्धेचे अंतिम सामने
2008
2010
2016
2018
2023*
जडेजानेही मिळवली जागा
रोहितपाठोपाठ रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यानेही या खास यादीत जागा मिळवली आहे. जडेजा चौथ्यांदा आशिया चषक अंतिम सामना खेळत आहे. जडेजा या यादीत चार खेळाडूंसोबत संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, एमएस धोनी, नवज्योत सिंग सिद्धू आणि ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर यांच्या नावाचाही समावेश आहे. या चारही खेळाडूंनी आतापर्यंत 4 वेळा आशिया चषक अंतिम सामना (Asia Cup Final) खेळला आहे. (Most Asia Cup Finals Played for India Rohit Sharma created Record)
सर्वाधिक आशिया चषक अंतिम सामना खेळणारे भारतीय
5 – रोहित शर्मा*
4 – रवींद्र जडेजा*
4 – मोहम्मद अझरुद्दीन
4 – एमएस धोनी
4 – नवज्योत सिंग सिद्धू
4 – सचिन तेंडुलकर
हेही वाचा-
Asia Cup 2023: कॅप्टन रोहितने गमावला टॉस, भारताच्या 5 वाघांचे Finalमध्ये कमबॅक
भारताला भिडण्यासाठी ऑस्ट्रेलिया तयार, वनडे मालिकेसाठी संघ घोषित