---Advertisement---

शाबास गड्यांनो…! अश्विन आणि विहारी यांच्या जोडीने रचलाय ‘हा’ कमाल विक्रम

On: सोमवार, जानेवारी 11, 2021 6:44 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या सिडनीतील कसोटी सामन्यात, हनुमा विहारी व रविचंद्रन अश्विन यांनी उत्तम शतकी भागीदारी केली. विहारी व अश्विन यांच्यात झालेल्या या भागीदारीमुळेच पराभवाच्या गर्तेत असलेल्या भारतीय संघाला सामना वाचविण्यात यश मिळाले. विहारी व अश्विन यांच्या या खेळीचे संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून कौतुक केले जात आहे. या भागीदारी दरम्यानच विहारी व अश्विन यांनी एक मोठा विक्रम आपल्या नावे केला असून, सहाव्या विकेटसाठी नाबाद असताना भारतासाठी सर्वात जास्त चेंडू खेळण्याचा विक्रम त्यांनी आपल्या नावे केला आहे.

आपल्या भागीदारी दरम्यान विहारी व अश्विन यांनी तब्बल 259 चेंडू खेळले आहे. यानंतर क्रमांक येतो तो एमएस धोनी आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा. एमएस धोनी आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी पाकिस्तान विरुद्ध 137 चेंडू खेळले होते. त्यापाठोपाठ सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण असून त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदा 122 चेंडूंचा तर धोनी आणि विराट कोहलीने 121 चेंडू खेळलेले आहेत.

सामन्याच्या पाचव्या दिवशी फलंदाजी करताना विहारीने 161 तर अश्विनने 128 चेंडूंचा सामना केला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी यावेळी दोघांविरुद्ध विविध रणनीतीने गोलंदाजी केली. पण त्याचा काहीही फरक न पडता दोघेही आत्मविश्वासाने संपूर्ण दिवस मैदानात तळ ठोकून होते. ऑस्ट्रेलियाने भारताला या सामन्यात विजयासाठी 407 धावांचे आव्हान दिले होते. पण पाचव्या दिवसाचा खेळ संपपर्यंत भारताने विहारी आणि अश्विन यांच्या भागीदारीमुळे 5 बाद 338 धावा केल्या होत्या, त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला.

महत्त्वाच्या बातम्या –

सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी पंतची धमाकेदार फलंदाजी, आजी-माजी क्रिकेटर्सनी थोपटली पाठ

टीम इंडियाची ताकद जगासमोर! सिडनीत ऐतिहासिक कामगिरी करत भारताने रचला ‘हा’ मोठा विक्रम

सिडनी कसोटीतील जबरदस्त कामगिरीनंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये उत्साहाचे वातावरण, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---