इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील १७वा सामना रविवारी (४ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. शारजाह येथे झालेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद २०८ धावा केल्या. दरम्यान अष्टपैलू खेळाडू इशान किशनने अंतिम षटकात फलंदाजी करताना एक नवा विक्रम केला.
नाणेफेक जिंकत मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने पहिल्यांदा फलंजाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या डावाची सुरुवात जास्त चांगली झाली नाही. पहिल्या ६ षटकांच्या आतच मुंबईने रोहित आणि सूर्यकुमार यादव यांच्या विकेट गमावल्या. पुढे एका बाजूने संघाचा डाव पुढे नेत असलेले क्विंटन डी कॉक (३९ चेंडूत ६७ धावा), इशान किशन (२३ चेंडू ३१ धावा) आणि हार्दिक पंड्याही (१९ चेंडू २८ धावा) २०व्या षटकापर्यंत पव्हेलियनला परतले.
आता २०व्या षटकातील फक्त ४ चेंडू उरले होते आणि स्ट्राईकवर उभा होता ६व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला क्रुणाल पंड्या. सिद्धार्थ कौलने षटकातील तिसरा चेंडू टाकला आणि इकडे क्रुणालने दमदार षटकार ठोकला. एवढेच नव्हे तर, त्यापुढील तीनही चेंडूंवर त्याने २ चौकार आणि एक षटकार लगावला. थोडक्यात या धुंरधरने ४ चेंडूत २० धावा केल्या. यासह क्रुणाल आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक चेंडूंचा सामना करताना प्रत्येक चेंडूववर चौकार किंवा षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे.
आयपीएलमध्ये क्रुणालव्यतिरिक्त हा अनोखा विक्रम नोंदवण्याचा पराक्रम दिपक हूडा आणि मोईसेस हेनरिक्सने केला आहे. हूडाने २०१९ साली हैदराबादकडून आणि हेनरिक्सने २०१३ साली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून ३ चेंडूंचा सामना करत हा विक्रम केला होता. तर टी२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक चेंडूंचा सामना करताना प्रत्येक चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रिंकू सिंग अव्वल स्थानावर आहे. त्याने २०१४ साली सर्वाधिक ५ चेंडू खेळत हा कारनामा केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये ‘असा’ नकोसा विक्रम करणारा रोहित शर्मा दुसराच भारतीय सलामीवीर
नको रे बाबा! ‘कोलकाता संघातील खेळाडूंसोबत फलंदाजी करणे…’ मॉर्गनने दिली प्रतिक्रिया
हाॅट है भाई!! दुबईत पोहोचताच बेन स्टोक्सची पहिली प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख-
बेंगलोरने राजस्थानविरुद्धचा सामना एकहाती जिंकला; पाहा राजस्थानच्या पराभवाची ३ प्रमुख कारणे
वाढदिवस विशेष: यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?
विजयासाठी आसुसलेल्या चेन्नईला हरवायचंय.. पंजाबला करावे लागतील ३ महत्वाचे बदल….