शुक्रवारी (31 जानेवारी) बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीमध्ये (CAC) भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मदन लाल (Madan Lal), आर.पी सिंग (R. P. Singh) आणि सुलक्षणा नाईक (Sulakshana Naik) यांची निवड करण्यात आली. त्यामुळे आता राष्ट्रीय निवड समितीतील उर्वरित दोन रिक्त पदे भरण्यासाठी सीएसीद्वारे मुलाखती घेण्यात येतील.
वरिष्ठ निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांचा कार्यकाळ सप्टेंबर 2019मध्येच संपला होता. परंतु; नवीन सदस्यांची नियुक्ती होईपर्यंत त्यांना कार्यरत राहण्यास सांगण्यात आले होते.
याव्यतिरिक्त निवड समीतीचे माजी सदस्य गगन खोडा (Gagan Khoda) यांनाही हेच आदेश देण्यात आले होते. पण आता काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने या दोघांच्या रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी अर्ज मागवले होते.
पुढील निवड समिती अध्यक्षांच्या संदर्भात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, “पाच सदस्यांनी बनलेल्या या समितीमध्ये सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूची अध्यक्षपदी निवड करण्यात येईल. यावेळी कोणत्या खेळाडूने सर्वात आधी भारतीय संघासाठी कसोटी सामने खेळले आहेत, हे लक्षात न घेता कोणत्या खेळाडूने भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत हे पाहिले जाईल.”
“मुख्य निवडकर्ता हा सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंपैकी एक असेल,” असेही गांगुली यावेळी म्हणाला.
तथापि बीसीसीआयच्या आचार संहितेत असे म्हटले आहे की, निवड समिती सदस्यापैंकी सर्वात वरिष्ठ सदस्याची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात येईल.
निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी अनेक माजी क्रिकेटपटूंनी अर्ज केले आहेत. यामध्ये अजित आगरकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, व्यंकटेश प्रसाद, राजेश चव्हाण, नयन मोंगिया, चेतन चव्हाण, निखिल चोप्रा, अबे कुरुविला या माजी क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
नोव्हाक जोकोविचने जिंकले आठवे ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद!
वाचा👉https://t.co/9hDcHhcSfZ👈#म #मराठी #AustralianOpen #AO2020 #AusOpen— Maha Sports (@Maha_Sports) February 2, 2020
रोहित शर्मा एक्सप्रेस सुसाट; सचिन, कोहली, धोनीसारख्या खेळाडूंच्या यादीत सामील
वाचा👉https://t.co/oaxSprsoOs👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @ImRo45— Maha Sports (@Maha_Sports) February 2, 2020