---Advertisement---

आयसीसी टी२० क्रमवारीत केएल राहुलने मिळवले कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान!!

On: सोमवार, फेब्रुवारी 3, 2020 4:56 PM
---Advertisement---

न्यूझीलंड विरुद्ध भारत संघातील 5 सामन्यांची टी20 मालिका काल(2 फेब्रुवारी) पार पडली. या मालिकेतील सर्व सामने जिंकून भारताने 5-0 असा विजय मिळवला. या मालिकेनंतर आज(3 फेब्रुवारी) आयसीसीने टी20 क्रमवारी जाहीर केली आहे.

या क्रमवारीनुसार फलंदाजांच्या यादीत भारताचा युवा फलंदाज केएल राहुलने मोठी झेप घेतली आहे. तो आता 823 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी आहे.

त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेत शानदार कामगिरी केली. त्याने या मालिकेत 5 सामन्यात मिळून 224 धावा केल्या. यात त्याच्या 2 अर्धशतकांचा समावेशही आहे. त्यामुळे त्याला या मालिकेतील मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता.

त्याचबरोबर फलंदाजांच्या टी20 क्रमवारीत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मानेही 3 स्थानांची प्रगती करत 10 वे स्थान मिळवले आहे. तर श्रेयस अय्यरने तब्बल 63 स्थानांची झेप घेत 55 वे स्थान मिळवले आहे. तसेच मनिष पांडे 58 व्या क्रमांकावर आला आहे. याबरोबर भारताचा कर्णधार विराट कोहली 9 व्या क्रमांकावर कायम आहे.

त्यामुळे फलंदाजांच्या क्रमवारीत 10 क्रमांकामध्ये भारताचे राहुल, विराट आणि रोहित असे 3 फलंदाज आहेत.

त्याचबरोबर गोलंदाजांच्या यादीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 26 स्थानांची गरुडझेप घेत 11 वे स्थान मिळवले आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहल 10 स्थानांनी प्रगती करत 30 स्थानावर आला आहे.

त्याचबरोबर न्यूझीलंड विरुद्ध टी20 मालिकेत सर्वाधिक 8 विकेट्स घेणाऱ्या शार्दुल ठाकूरने तबब्ल 34 स्थानांनी वर जात 57 वे स्थान मिळवले आहे. याव्यतिरिक्त रविंद्र जडेजा 76 व्या तर नवदीप सैनी 71 व्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही.

तसेच न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सननेही फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. तो आता 23 व्या स्थानावरुन 16 व्या स्थानावर आला आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज टीम सिफर्ट 73 व्या क्रमांकावरुन 34 व्या स्थानावर आणि रॉस टेलर 50 व्या क्रमांकावरुन 39 व्या स्थानावर आला आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत फिरकीपटू इश सोधीने 6 स्थानांची प्रगती करत 13 वे स्थान मिळवले आहे.

तसेच नुकतीच काही दिवसांपूर्वी पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघातही 3 सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेचाही या क्रमवारीत विचार करण्यात आला आहे.

पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर कायम आहे. तसेच शोएब मलिक आणि मोहम्मद हाफिजने अनुक्रमे 45 वे आणि 71 वे स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर बांगलादेशचा फलंदाज तमिम इक्बाल 50 व्या क्रमांकावर आला आहे.

पाकिस्तानचा वेगवान युवा गोलंदाज शाहिन आफ्रिदीने गोलंदाजांच्या क्रमवारीत 72 व्या स्थानावरुन मोठी झेप घेत 39 वे स्थान मिळवले आहे. तसेच बांगलादेशचा गोलंदाज अल अमिन हुसेनने 25 स्थानांची प्रगती करत 51 वे स्थान मिळवले आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1224274925357170688

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---