गुरुवारी (दि. 08 जून) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने सर्व विकेट्स गमावत 469 धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने संघर्ष केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने 5 बाद 151 धावा बनवल्या होत्या. भारतीय संघासाठी सर्वाधिक 48 धावा अष्टपैलू रवींद्र जडेजाने काढल्या. त्याला बाद करताना ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फिरकीपटू नॅथन लायन व स्टिव्ह स्मिथ यांनी एक विक्रम बनवला.
या सामन्यात भारताच्या प्रमुख फलंदाजांनी कच खाल्ली. भारतीय संघ अडचणीत असताना सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जडेजाने प्रति आक्रमण केले. त्याने 51 चेंडूवर 48 धावांची खेळी केली. यामध्ये सात चौकार व एका षटकाराचा समावेश होता. लायनने स्लीपमध्ये स्मिथच्या हाती त्याला झेल देण्यास भाग पाडले.
यासह लायन-स्मिथ जोडीने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 55 फलंदाजांना बाद केले आहे. एक गोलंदाज व एक क्षेत्ररक्षक यांनी कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांना बाद करण्याच्या विक्रमात ही जोडी संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी भारताचे दिग्गज राहुल द्रविड व अनिल कुंबळे यांनी अशी कामगिरी 55 वेळा केलेली. या यादीमध्ये प्रथम स्थानी श्रीलंकेचा माहेला जयवर्धने व मुथय्या मुरलीधरन हे आहेत. जयवर्धनेने मुरलीधरनच्या गोलंदाजीवर तब्बल 77 झेल टिपले होते.
या सामन्याचा विचार केला गेल्यास ऑस्ट्रेलियन संघाने ट्रेविस हेडचे दीड शतक व स्मिथच्या शतकाच्या जोरावर 467 धावा केल्या. भारतीय संघासाठी मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार बळी मिळवले. त्यानंतर दुसऱ्या दिवसाखेर भारताचा डाव 5 बाद 151 असा उभा आहे. प्रमुख फलंदाजांना अपयश आल्यानंतर जडेजा व अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला. तिसऱ्या दिवशी रहाणे व भरत यांच्या खांद्यावर संघाला फॉलोऑन पासून वाचवण्याची जबाबदारी असेल.
(Most Catches By Fielder Of A Bowler Smith Lyon On Second Spot)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विक्रमवीर रोहित! 15 धावांवर बाद होऊनही रचला इतिहास, ICC Finalमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा एकटाच खेळाडू
नॉटआऊट असूनही रहाणेला पंचांनी दिले आऊट, मग मैदानात झालेला ड्रामा आख्ख्या जगाने पाहिला; Video