लंडन। आज(14 जूलै) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामना लॉर्ड्स मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 241 धावा केल्या आहेत.
या सामन्यात इंग्लंडकडून क्षेत्ररक्षण करत असताना जो रुटने न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू जेम्स निशामचा झेल घेतला. रुटचा या विश्वचषकातील हा 13 वा झेल आहे. त्यामुळे तो कोणत्याही एका वनडे मालिकेत किंवा एका वनडे स्पर्धेत सर्वाधिक झेल घेणारा क्षेत्ररक्षक (यष्टीरक्षक व्यतिरिक्त) ठरला आहे.
याआधी हा विक्रम ऍलेन बॉर्डर आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नावावर संयुक्तरित्या होता. बॉर्डर यांनी 1988-89 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या बेन्सन आणि हेजस वर्ल्ड सिरीजमध्ये 12 झेल घेतले होते. तर लक्ष्मणने 2004ला ऑस्ट्रेलियामध्येच झालेल्या व्हीबी सिरीज मध्ये 12 झेल घेतले होते.
याबरोबरच रुट हा एका विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणाराही क्षेत्ररक्षक आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा महान माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या 2003 विश्वचषकातील 11 झेलच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
रुटने क्षेत्ररक्षणात हा विश्वविक्रम केला असला तरी मात्र आज त्याला फलंदाजी खास काही करता आलेला नाही. इंग्लंडकडून 242 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तो 30 चेंडूत 7 धावा करुन बाद झाला आहे.
#एका वनडे मालिकेत/स्पर्धेत सर्वाधिक झेल घेणारे क्षेत्ररक्षक (यष्टीरक्षक व्यतिरिक्त) –
13 झेल – जो रुट (2019 विश्वचषक)
12 झेल – ऍलेन बॉर्डर (1988-89 बेन्सन आणि हेजस वर्ल्ड सिरीज)
12 झेल – व्हीव्हीएस लक्ष्मण (2004 व्हीबी सिरीज)
#एका विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारे क्षेत्ररक्षक (यष्टीरक्षक व्यतिरिक्त) –
13 झेल – जो रुट (2019)
11 झेल – रिकी पाँटिंग (2003)
10 झेल – फाफ डुप्लेसिस (2019)
9 झेल – रिली रोसोऊ (2015)
9 झेल – जॉनी बेअरस्टो (2019)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–मैदानात पाऊल ठेवताच केन विलियम्सनचा या दिग्गज कर्णधारांच्या खास यादीत झाला समावेश
–१२ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडत कर्णधार विलियम्सनने रचला मोठा इतिहास
–विश्वचषक २०१९: हे माहित आहे का? आज मैदानावर उपस्थित असणाऱ्यांपैकी हा एकमेव व्यक्ती आहे विश्वविजेता