सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आहे. त्यातही भारताचा फिरकीपटू आर अश्विनच्या गोलंदाजीवर झेल सोडले गेल्याने नकोसा विक्रम त्याच्या खात्यात जमा झाला आहे.
मे २०१८ पासून आतापर्यंत अश्विनने ३१ कसोटी डावात गोलंदाजी केले आहेत. यादरम्यान अश्विनच्या गोलंदाजीवर भारतीय खेळाडूंनी एक-दोन नव्हे तर तब्बल १५ झेल सोडले आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, केवळ अश्विनवर अशी वेळ आली नाही. तर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावरही बऱ्याचदा अशी नामुष्की ओढावली आहे. मे २०१८ पासून कसोटीत शमीच्या गोलंदाजीवर भारतीय खेळाडूंनी १४ वेळा झेल सोडले आहेत.
याशिवाय ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन, इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अंडरसनव स्टुअर्ट ब्रॉड आणि वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रिल यांच्या गोलंदाजीवरही त्यांच्या संघसहकाऱ्यांनी १० पेक्षा जास्त झेल सोडले आहेत.
मे २०१८ पासून कसोटीत सर्वाधिक झेल ‘या’ ५ गोलंदाजांच्या गोलंदाजीवर सोडण्यात आले
नॅथन लायन- २४ झेल (३९ डाव)
जेम्स अंडरसन- १९ झेल (३८ डाव)
स्टुअर्ट ब्रॉड- १६ झेल (५२ डाव)
आर अश्विन- १५ झेल (३१ डाव)
शॅनन गॅब्रिल (३२ डाव) आणि मोहम्मद शमी (३७ डाव)- १४ झेल
ऑस्ट्रेलियाचे भारतापुढे तगडे लक्ष्य
भारत-ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटी सामन्याविषयी बोलायचे झाले तर, चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून भारतीय संघ २ बाद ९८ धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलिया संघाने ४०७ धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले आहे.
ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात कॅमरॉन ग्रीनने सर्वाधिक ८४ धावा केल्या होत्या. सोबतच स्टिव्ह स्मिथने ८१ धावा आणि मार्नस लॅब्यूशानेने ७३ धावांचे योगदान दिले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ भारताला ४०७ धावांचे तगडे आव्हान देऊ शकला.
महत्त्वाच्या बातम्या-
IND v AUS Live : ऑस्ट्रेलियाचे भारताला ४०७ धावांचे आव्हान; भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात
IND vs AUS: जडेजा तर बाहेर गेला, पंतचे काय? ‘ही’ आहे मोठी अपडेट
एकाच कसोटी सामन्यात शतक-अर्धशतक; एक-दोन नव्हे तब्बल ११ वेळा ‘यांनी’ केलाय हा पराक्रम






