बेंगलोर | गुरुवारी भारत विरुद्ध अफगानिस्तान कसोटी सामन्यात मुरली विजयने कसोटीतील १२वे शतक साजरे केले. याबरोबर कसोटीत ओपनर (सलामीवीर) म्हणुन सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी आला आहे.
भारताकडून कसोटीत ओपनर म्हणुन सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम हा सुनिल गावसकर यांच्या नावावर आहे. त्यांनी भारताकडून १२५ सामन्यात ३४ शतके केली. त्यातील ३३ शतके त्यांनी ओपनर म्हणुन केली आहेत.
त्याखालोखाल विरेंद्र सेहवागचा क्रमांक लागतो. त्याने १०४ कसोटी सामन्यात २३ शतके केली असुन त्यात २२ शतके त्याने ओपनर म्हणुन केली आहेत.
भारताकडून ओपनर म्हणुन सर्वाधिक शतके केलेले खेळाडू
३३- सुनिल गावसकर
२२- विरेंद्र सेहवाग
१२- मुरली विजय
९- गौतम गंभीर
महत्त्वाच्या बातम्या:
–फक्त आणि फक्त फिटनेससाठी धोनीने केला प्राणाहुन प्रिय गोष्टीचा त्याग
–इंग्लंड क्रिकेटच्या चाहत्यांमुळे अाॅस्ट्रेलियन खेळाडू वैतागले
–सचिन, गेलनंतर अशी कामगिरी करणारी ती ठरली तिसरीच क्रिकेटपटू