विशाखापट्टणम। भारत विरुद्ध विंडीज दुसऱ्या वन-डे सामन्यात आज (24 ऑक्टोबर) विराट कोहलीने वन-डे कारकिर्दीतील 10 हजार धावांचा टप्पा पार केला. यामध्ये त्याच्या 37 शतकांचा आणि 48 अर्धशतकांचा समावेश आहे.
2018 वर्षात कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्यात विराट कोहलीचेच नाव अव्वल आहे. यावर्षी त्याने 9 शतके केली आहेत. तसेच त्याने 2017ला 11 शतके केली होती.
2017 आणि 2018 या सलग दोन वर्षात कर्णधार म्हणून वनडेत सर्वाधिक शतके करण्यात विराटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटींगची बरोबरी केली आहे.
पॉटींगने 2005 आणि 2006ला दोन्ही वर्षी 9 शतके केली होती. तर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथने 2005ला 9 शतके केली होती.
तसेच विंडीज विरुद्ध वनडेमध्ये सलग तीन शतके करण्यामध्ये विराट कोहली आणि पाकिस्तानच्या बाबर आझमचा समावेश आहे. विराटने विंडीज विरुद्ध सर्वाधिक असे पाच शतके केली आहेत.
आतापर्यंत विराटने वनडे 37 तर कसोटीमध्ये 24 असे एकूण 61 शतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–कर्णधार म्हणून विराटने केली सलग दुसऱ्या वर्षी ही विलक्षण कामगिरी
–१० हजार धावा करणाऱ्या कोहलीचे हे आहेत १० खास पराक्रम